पंढरपूर लाईव्हचे प्रयत्न, पुण्यातील तरुणाचा प्रामाणीकपणा आणि समाजसेवक गणेश अंकुशराव यांची तत्परता यामुळे पंढरीतील एका तरुणीची पुण्यात हरवलेली पर्स परत मिळाली आहे.
पंढरपूर लाईव्ह हे ई-न्युज वेब पोर्टल चे दर्शक हे केवळ सोलापूर जिल्ह्यापुरतेच मर्यादित राहिले नसुन संपुर्ण महाराष्ट्रात पंढरपूर लाईव्हचे वाचक मोठ्या संख्येने निर्माण झाले आहेत. पंढरपूर लाईव्हची लोकप्रियता तर वाढलेली आहेच; परंतु यासोबतच पंढरपूर लाईव्हवर सर्वसामान्यांचा विश्वासही अधिक दृढ झालेला आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ ची टीमही दर्शकांच्या व सर्वसामान्यांच्या विश्वासास पात्र राहुन केवळ वार्तांकनच नव्हे तर वार्तांकनासोबतच सर्वसामान्यांच्या जीवनात उपयोगी पडेल असे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे खालील बातमी.
काल दि. 2 जुन रोजी पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांना पुण्यातुन एका अनोळखी क्रमांकावरुन कॉल आला. ‘‘सर माझे नाव गौरव विजय पवार मी
राहणार देहूरोड गांधीनगर पुणे येथील असुन मला पुणे येथील चिंचवड बस स्टॉपजवळ एक पर्स सापडली आहे. या पर्समध्ये कांही महत्वाची कागदपत्रे एटीएम कार्ड व कांही पैसे आहेत. यात मिळालेल्या आधारकार्डवरुन ही पर्स पंढरीतील एका मुलीची असण्याची शक्यता आहे. आपले पंढरपूर लाईव्ह वरुन तुमचा संपर्क क्रमांक मिळाला. कृपया सदर पर्स संबंधीत मुलीला परत करण्यासाठी आम्हाला मदत करा.’’
वस्तुस्थिती जाणल्यानंतर पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांनी पंढरीतील समाजसेवक तथा महर्षी वाल्मिकी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांना याबाबत माहिती देऊन रामबाग परिसरातील या मुलीच्या घरी जावुन शहानिशा करण्याची विनंती केली. त्यानुसार गणेश अंकुशराव यांनीही तत्परतेने सदर मुलीच्या घराचा शोध घेवुन तिच्या पालकांचा संपर्क क्रमांक दिला. पुण्याचे गौरव विजय पवार व सदर मुलीचे पालकांचा संपर्क झाला. आज मुलीचा भाऊ ओंकार हेमंत मुळे, रा. रामबाग रोड, जुनी पेठ पंढरपूर याने पुण्यात जावुन पवार यांची भेट घेतली. पवार यांनी पर्समधील कागदपत्रे, पैसे, एटीएम वगैरेसह ही बॅग ओंकारला परत केली. व दोघांनीही पंढरपूर लाईव्हचे संपादक भगवान वानखेडे यांना कॉल करुन आभार व्यक्त केले.
जिची पर्स हरवली होती ती मुलगी ऐश्वर्या हेमन्त मुळे रा. पंढरपुर ही नोकरीस आहे. चिंचवड बस स्टॉप जवळ तिची पर्स हरवली होती. पर्स मिळाल्यामुळे आनंद व्यक्त करत तिच्या कुटूंबियांनी गौरव पवार पुणे यांचेसह पंढरपूर लाईव्हचे आभार व्यक्त केले. या सर्व घटनाक्रमात महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांची तत्परताही महत्वाची ठरली.





0 Comments