अकरा जुलैपासून तीन दिवस पंढरपुरात मद्य विक्रीस बंदी





सोलापूर:- पंढरपूर येथे भरणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर आणि शहरापासून पाच किलोमीटरच्या परिसरातील सर्व देशी आणि विदेशी मद्य विक्री दुकाने 11,12 आणि 13 जुलै 2019 रोजी पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी  जारी केले आहेत.
            त्यांनी आदेशात नमूद केले आहे, की 11, 12 आणि 13 जुलै 2019  रोजी पूर्ण दिवस आणि पंढरपूर शहरातील आणि शहरापासून पाच किलोमीटर त्रिज्या परिसरातील सर्व देशी आणि विदेशी मद्य दुकाने सायंकाळी पाच नंतर बंद ठेवण्यात येतील. त्याचबरोबर श्री. संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या मुक्कामाच्या ठिकाणी ही देशी विदेशी मद्य विक्री दुकान पूर्ण दिवस बंद ठेवली जाणार आहेत.

 त्याचा तपशील पुढीलप्रमाणे सहा जुलै 2019 नातेपुते येथे पूर्ण दिवस बंद राहतील. सात जुलै 2019 येथे माळशिरस, अकलूज पूर्ण दिवस बंद राहतील. आठ जुलै 2019 रोजी वेळापूर, बोरगाव, श्रीपूर, माळीनगर, येथील दुकाने बंद राहतील. नऊ जुलै 2019 रोजी  भंडीशेगाव, पिराची कुरोली येथील दुकाने बंद राहतील. 10 जुलै 2019 रोजी वाखरी येथील दुकाने बंद ठेवण्याचे आदेशात नमूद केले आहे.
 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम 142  अनुसार मिळालेल्या अधिकारानूसार जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी हे आदेश जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments