पंढरपूर.24- शेगांव दुमाला हद्दीतील 65 एकर मधील शौचालयाच्या कट्ट्यावर एक अनोखळी व्यक्ती ह्रद्यविकाराच्या झटक्याने मयत झाली आहे. सदर मयत व्यक्तीबाबत माहिती असल्यास सबंधितांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधवा असे, आवाहन पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी केले आहे.
या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 60 वर्षे असून, अंगाने मजबुत, केस पांढरे, अंगात चौकडी पांढऱ्या रंगाचा शर्ट , धोतर व पांढरा छाटन असे मयत व्यक्तीचे वर्णन आहे.
संबधीतांनी तसेच ओळखीच्या व्यक्तीने याबाबत पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा (भ्रमणध्वनी क्र-9822846304) असे आवाहन करण्यात आले आहे.





0 Comments