“आदर्श शिक्षक पुरस्कार - 2019 च्या प्रस्तावासाठी आवाहन”


पंढरपूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील सर्वशाखीय सुवर्णकार बंधूं-भगीनींना “ युनिक गोल्डस्मिथ फोरम, महाराष्ट्र ” यांच्या वतीने आवाहन करण्यात येते की, महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षक,
माध्यमिक शिक्षक, इंग्लिश मेडिअम स्कूल शिक्षक, सर्वच शाळांचे मुख्याध्यापक, अपंगांची शाळा शिक्षक, आदिवासी क्षेत्रात काम करणारे शिक्षक, कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, स्काऊट शिक्षक, एन.सी. सी. शिक्षक, प्रयोगशाळा शिक्षक, ग्रंथपाल व उच्च माध्यमिक शिक्षण विभागामध्ये सेवाकार्य करणाऱ्या तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये इतर पदांवर कार्यरत असणाऱ्या निवडक सर्वशाखीय सुवर्णकार बंधूं-भगीनींना त्यांच्या शैक्षणिक अर्हता व पात्रता ; सामाजिक दर्जा, सामाजिक समरसता, सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता, संवेदनशीलता यासाठी केलेले कार्य ; चित्रकला, विज्ञान यासारख्या प्रदर्शनातील सहभाग ; शैक्षणिक संशोधन, शिक्षणोपयोगी उपक्रम, निबंध लेखन, वर्तमान पत्रातील लेख, अल्पबचत, कुटुंब कल्याण, जनगणना, पल्स पोलिओ विविध शिबीरे, कार्यशाळा आदी राष्ट्रीय कार्यात केलेले काम ; कोणत्याही साहित्य लेखन प्रकारातील प्रकाशित पुस्तक 


; याची दखल घेऊन वैशिष्ट्यपूर्ण शैक्षणिक सेवाकार्याबद्दल शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय “ युनिक टिचर ऑफ गोल्डस्मिथ - 2019 ” तसेच उत्कृष्ट शैक्षणिक सेवाकार्य करणाऱ्या निवडक सर्वशाखीय सुवर्णकार बंधूं-भगीनींना “ एक्सलन्ट अकॅडमीक सर्व्हिस अवॉर्ड - 2019 ” हा राज्यस्तरीय पुरस्कार सुवर्ण पदक, सन्मानपत्र, महावस्त्र, सन्मानचिन्ह, ग्रंथ, सन्मानबिल्ला, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्याचा आणि सन्मानीत करण्याचा “ युनिक गोल्डस्मिथ फोरम, महाराष्ट्र ” चा मानस आहे.
          तरी महाराष्ट्रातील इच्छूक सर्वशाखीय सुवर्णकार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधूं-भगीनींनी प्रस्ताव अर्ज मागविण्यासाठी 9922514300 किंवा 9421042143 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे “ युनिक गोल्डस्मिथ फोरम, महाराष्ट्र ” यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.




-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments