पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले अल्ताफ उस्मान मुलाणी यांना साविञीबाई फुले पुणे विद्यापीठातुन पी.एच.डी. प्राप्त झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग या विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले अल्ताफ उस्मान मुलाणी यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे येथील ए.आय.एस.एस.एम.एस. इन्स्टिट्यूट ऑफ इनफाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी पुणे चे प्राचार्य डॉ. पी. बी. माने यांच्या मार्गदर्शनाखाली "एरिया ऑप्टीमायझेशन ऑफ इनव्हिझिल डिजिटल इमेज वॉटरमार्किंग ऑन रिकाॅनफिगरेबल प्लॅटफॉर्म" या विषयावर प्रबंध सादर केला होता.
प्राध्यापक अल्ताफ उस्मान मुलाणी यांना पी.एच.डी. मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. रविंद डॉ व्यवहारे, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. संपत देशमुख, डाॅ. राजश्री बाडगे, प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डॉक्टर अल्ताफ उस्मान मुलाणी यांचे अभिनंदन केले.





0 Comments