सख्ख्या भावाच्या खुनांमधील आरोपीला दोन दिवस पोलिस कस्टडी मंजूर ......
पंढरपूर शहर गु.र.न.९७३/२०१९ भादवि कलम 302 323 इत्यादी प्रमाणे
पंढरपूर येथील संभाजी चौकातील सचिन माळवदकर याने स्वतः च्या सख्ख्या भावाला त्याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध जुळवून दे म्हणून वाद केला. या वादातून सख्ख्या भावाचा आरोपी सचिन माळवदकर यांनी टॉवेलने गळा आवळून खून केला आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिसांनी आरोपी सचिन माळवदकर याला पंढरपूर येथील ज्युडिशिअल मॅजिस्ट्रेट न्यायालय यांच्याकडे हजर केले असता पोलिसांनी तीन दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड मागितले होती.
आरोपीच्या वतीने अॅड.किर्तीपाल सुनिल सर्वगोड व अॅड.सागर दत्तात्रय आटकळे यांनी युक्तिवाद करून आरोपीला पोलिस कस्टडीची गरज नाही, त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात यावी. अशी मागणी केली होती परंतु पंढरपूर येथील मेहरबान न्यायालयाने आरोपीला दोन दिवसाची पोलिस कस्टडी रिमांड दिनांक ८/६/२०१९ रोजी पर्यंत देण्यात आली आहे.





0 Comments