● *पोलिस करतायत किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई*
मंगळवेढा (प्रतिनिधी) संतांची भुमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात सध्या अवैध जुगार, मटका व अवैध वाहतूक खुले आम चालत असुन मंगळवेढा पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी लक्ष देण्याची मागणी नागरिकांतुन जोरदार होत आहे.
मंगळवेढा तालुक्यात सध्या खूप मोठ्या प्रमाणात जुगार व मटका चालत असून याकडे मंगळवेढा पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. मंगळवेढा तालुक्यात मोठ्या प्रमाणात चालणारे अवैध वाहतूक जुगार मटका यावर कारवाई न करता पोटाची खळगी भरण्यासाठी छोटासा व्यवसाय करणाऱ्या टपरीधारकांवर गुटखा व मावा विक्रीच्या नावाखाली मंगळवेढा पोलीस प्रशासन कारवाई करीत असल्याने नागरिकांमधून पोलीस प्रशासनाविषयी तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागातील गुटखा विक्री करणाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने पकडून कारवाईस भाग पाडले असल्याची चर्चा सध्या मंगळवेढा तालुक्यात सर्वत्र होत आहे. याबाबत सविस्तर वृत्तांत असे आहे की, एका ऑनलाइन पोर्टलवर एका महिलेने पान किंवा गुटखा विक्रीचे शुटींग करून एका ऑनलाईन पोर्टलवर तक्रार केली असल्याने पोलिसांनी कारवाई केली असल्याची चर्चा सध्या तालुक्यात जोरदार होत आहे.
या तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवेढा पोलिसांनी ग्रामीण भागातील गुटखा विक्री करणाऱ्यावर रेड केली असल्याची चर्चा होत आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता सोलापूर अन्नभेसळ प्रशासनाचे मंगेश लवटे यांनी या कारवाईची आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. वस्तुस्थिती पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वी अन्नभेसळ प्रशासनाला कळविणे बंधनकारक असतानाही पोलिसांनी अन्नभेसळ प्रशासनाला का कळवीले नाही हा प्रश्न आता समोर येत आहे. अन्नभेसळ प्रशासनाचे मंगेश लवटे हे आषाढी यात्रेच्या कामानिमित्त पंढरपूर येथे असल्यामुळे सोमवारी कार्यवाही न झाल्याने पोलिसांनी संबंधित गुटका पडलेल्या व्यक्तींना मंगळवारी पोलिस ठाण्यात बोलावले तदनंतर अन्नभेसळ प्रशासनाचे अधिकारी मंगेश लवटे यांना पोलिसांनी सदर तक्रारीचे पत्र दिल्यानंतर मंगेश लवटे यांनी मुद्देमालाची पाहणी करून कारवाई प्रक्रिया केली आहे.
अवैद्य गुटका विक्री व मावा विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. अशी अवैध विक्री करण्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. परंतु मंगळवेढा तालुक्यात जुगार, मटका, अवैद्य वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असतानाही मंगळवेढा पोलिस किरकोळ गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करून काय साध्य करणार आहे. शिवाय या कारवाईमागे पोलिसांचा नेमका काय हेतु आहे हे अद्याप तरी स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून ही कारवाई केली आहे. हे आता जनतेसमोर येणे खूप गरजेच असुन सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतुन जोरदार होत आहे.





0 Comments