पंढरपूर: महाविद्यालयीन व परिसरातील शालेय विद्यार्थी, नागरिक व शेतकऱ्यांमध्ये मत्स्यसंगोपनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने केंद्र सरकारच्या नीलक्रांती योजनेअंतर्गत ‘नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड’
यांचेकडून मंजूर झालेल्या निधीतून तारापोरवाला मत्स्यालय व्यवस्थापन, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे, येथील रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात १० फुट लांब, ३ फुट रुंद व २ फुट उंच या आकारात भव्य काचेची शोभिवंत मत्स्यसंगोपन टाकी उभारण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. बी. घुटे यांचे हस्ते या मत्स्यटाकीचे अनावरण करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या सौ. सुनेत्राताई पवार, डॉ. सौ. रेखा मोहिते, मा. समाधान काळे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या मत्स्य संगोपन टाकीमध्ये विविध प्रकारचे रंगीबेरंगी मासे सोडण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोई, गोड्या पाण्यातील शार्क व गुरामी या माशांचा समावेश आहे. कालावधीमध्ये मत्स्यटाकीमध्ये माशातील वैविध्य वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या माध्यमातून मत्स्य संगोपनाची जागृती करण्यात येणार आहे. तसेच महाविद्यालयामध्ये लघुकालीन अभ्यासक्रमाच्या माध्यमातून ग्राहकांच्या मागणीप्रमाणे छोट्या मत्स्यटाक्या बनवून दिल्या जातात. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक भोईटे यांनी यावेळी दिली. या समारंभास महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.जे. तोडकरी, डॉ. एन.एन. तंटक, प्रा. ए.एस. चंदनशिवे, कार्यालयीन प्रमुख श्री. अनंता जाधव, प्रा. डॉ. विकास कदम, प्रा. डॉ. बी. बी. शितोळे, प्रा. सोनावणे, प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. सौ. सुजाता भोईटे, प्रा. डॉ. अमर कांबळे, प्रा. डॉ. शिल्पा पवार, प्रा. डॉ. आनंद देडे, प्रा. डॉ. अय्याज शेख, प्रा. अभिजीत कोष्टी, प्रा, प्रियांका घाडगे, श्री. राजकुमार निंबाळकर, श्री. पांडुरंग गुंड हे उपस्थित आदी शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.




0 Comments