राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना लेखीसोबत प्रात्याक्षिक परिक्षेचीही फी माफी


आमदार भारत भालके यांच्या तारांकित प्रश्नामुळे  
शासनाला घ्यावा लागला ऐतिहासिक निर्णय...

              पंढरपूर दि.29 ः सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी विधीमंडळात राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ करण्याबाबतच्या निर्णयावर प्रश्नोत्तराच्या तासात तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री. आशिष शेजार यांनी सोमवार दि.24.06.2019 रोजी सदर फी माफीची परिपूर्ती रक्कम एक महिन्याच्या आंत संबंधीत संस्थेच्या खात्यावर जमा करण्यात येईल. यापुढे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या लेखी परिक्षेसोबत प्रात्याक्षिक परिक्षेची फी देखील माफ करण्यात येईल. तसेच सदरची फी माफीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल अशी घोषणा केली. 
                सदरबाबत आमदार श्री भालके यांनी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील शाळेचे प्रस्ताव व त्याबाबतची परिपूर्ती बाबत मुळ प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देतांना राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना.श्री आशिष शेलार यांनी माहिती दिली की, शुल्क परिपूर्तीसाठी सोलापूर जिल्ह्यातील पात्र असलेल्या 972 माध्यमिक शाळांपैकी 518 शाळांचे प्रस्ताव प्राप्त झाले असून पंढरपूर तालुक्यातील 77 आणि मंगळवेढा तालुक्यातील 34 शाळांचा यामध्ये समावेश आहे. तसेच दुष्काळ जाहीर झालेल्या विभागातील इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून परिक्षा शुल्क माफी दिली जात आहे. त्यामुळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षण संचालकांकडे लेखी प्रस्ताव दाखल केलेले आहे, मात्र अद्याप त्याची पुर्तता झाली नाही. शिवाय जितक्या माध्यमिक शाळा विभागात आहे त्यापैकी निम्याच शाळेंचे प्रस्ताव विभागाकडे प्राप्त झाले आहेत. याबाबत आमदार श्री भारत भालके यांनी सभागृहात उपप्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देतांना ना.श्री शेलार यांनी असे आश्वासन दिले की, महसूल व वन विभागाच्या 31 ऑक्टोबर 2018 व 6 नोव्हेंबर 2018 या शासन निर्णयानुसार दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या तालुक्यांना आणि महसूल मंडळातील उर्वरित भागातील शाळांकडून असे प्रस्ताव प्राप्त करून यावर कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच या परिक्षा शुल्काची परिपूर्ती रक्कम एक महिन्याच्या आंत जमा केली जाईल. 
          आमदार श्री भालके यांच्या या तारांकित प्रश्नामुळे राज्यातील सर्व दुष्काळी भागातील सर्व जाती-धर्मातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीना खर्‍या अर्थाने आमदार श्री भारत भालके यांनी न्याय मिळवून दिला. त्यामुळे आता दुष्काळी भागातील शिक्षणाला उत्तम चालना मिळणार असल्याने राज्यातील दुष्काळी भागातील विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून सर्वत्र पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.





-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 43 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments