खळबळजनक-पंढरीतील भावा-भावाच्या भांडणात एकाचा मृत्यू



पंढरपूर प्रतिनिधी:-  पंढरीतील प्रदक्षिणा मार्गावर आज रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भावाभावांच्या घरगुती भांडणात एकाचा गळा आवळल्याने  मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
घरगुती कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या भांडणात एक भावाचा मृत्यू झाल्याची घटना आज, बुधवारी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. राजेंद्र माळवदकर असे मयताचे नाव असून त्याचा सख्खा भाऊ सचिन माळवदकर यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


येथील संभाजी महाराज चौकातील सचिन माळवदकर आणि राजेंद्र माळवदकर या दोघा भावांमध्ये घरगूती कारणावरून बुधवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास भांडणे झाली. भांडणाच्या दरम्यान गळा आवळला गेल्याने राजेंद्र माळवदकर (वय अंदाजे ४२ वर्षे ) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. 
घटनेचे वृत्त समजताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मयताचा भाऊ सचिन यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेचे वृत्त शहरात पसरताच खळबळ उडाली असून संभाजी चौकात बघ्यांची गर्दी झाली होती.



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com 

Post a Comment

0 Comments