माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे उर्जा मिळते - सरपंच सौ शशीकला कसबे
बिजापुरच्या डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयाचा पाकणीत माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
पंढरपूरः- ‘राजकीय पटलावर कार्य करताना जनतेच्या अनेक प्रकारच्या प्रश्नाना सामोरे जावे लागते. यासाठी मानसिकता निर्माण करावे लागते, अभ्यास करावा लागतो, परंतु माजी विद्यार्थी मेळाव्यामुळे मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रकारचा उत्साह, उर्जा निर्माण होते. त्यामुळे विद्यार्थी मेळावा नियमित घेतल्यास आठवणीच्या हिंदोळ्यावर झुलताना अनेक प्रकारची कामे आनंदी मुद्रेने मार्गी लागतात.’ असे प्रतिपादन डिकळस (ता. सांगोला)च्या सरपंच सौ शशीकला कसबे यांनी केले.
बिजापूर (कर्नाटक) मधील दक्षिण भारत हिंदी प्रचार सभा संचलित डॉ. बी.डी.जत्ती बी.एड. महाविद्यालयातील सन १९९६ मधील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पाकणीत अभिषेक मळा या ठिकाणी ‘माजी विद्यार्थी मेळावा’ संपन्न झाला आणि जाग्या झाल्या ‘त्या’ जुन्या आठवणी ! तत्कालीन प्राचार्य राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. व्ही.आर. देवगिरी. यांच्या कडक शिस्त पासून ते विद्यार्थ्यांच्या चुकांवर पांघरून घालणाऱ्या, वेळ परिस्थिती पाहून समजून घेणारे गुरुवर्य सौ पाटील, प्रा. महाम्बरी, प्रा. पाटील, प्रा. मुजावर यांच्या आठवणी ‘आठवण कॉलेजची, साठवण मैत्रीची’ या कार्यक्रमात निघाल्या.मागील वर्षापासून माजी विद्यार्थी मेळावा करण्यासाठी नियोजन होत होते.भारतभर विखुरल्या गेलेल्या विद्यार्थ्याना एकत्रित आणण्याचे अवघड कार्य करण्याचा विडा खऱ्या अर्थाने सर्वात प्रथम स्व. महेश कोरे यांनी उचलला. परंतु त्यांच्या अकस्मात निधनाने अर्धवट राहिलेले हे कार्य सोशल मिडीयाचा आधार घेत सर्व मित्रांना सहज शक्य झाले आणि अखेर सोलापूर –पुणे हायवे लगत असणाऱ्या पाकणी पासून दोन किमी. अंतरावरील ‘अभिषेक मळा’ येथे ‘आठवण कॉलेजची, साठवण मैत्रीची’ नामक कार्यक्रम करण्याचे ठरले.अनेकजण कुटुंबासह सहभागी झाले होते.
या मेळाव्यात कोणी प्रशासकिय अधिकारी, पत्रकार, पोलीस अधिकारी, तर कोणी स्वतःच शैक्षणिक संस्था निर्मिती केली होती. ‘जाना था जपान, पहुंच गये चीन’ अशीही काहींची अवस्था झाली होती. त्यामुळे काहीजण शिक्षणक्षेत्र सोडून स्वतःची कंपनी. मार्केटिंग फिल्ड, एस.टी. महामंडळ, यामध्ये स्थिरावले होते. तसेच कोणी नोकरी निमित्त परदेशात स्थायिक झाले होते तर काहीजणी गृहिणी झाल्या होत्या. काही मुली पतीला सहकार्य करण्यासाठी जॉब स्विकारला होता आणि हे सर्वचजण ‘माजी विद्यार्थी मेळाव्या’च्या निमित्ताने ‘अभिषेक मळा’मध्ये एकत्रित आले होते. बिजापुर मधील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आलेल्या अनुभवांचा पुढे कसा फायदा झाला हे सांगितले. ‘माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून ‘पैसे सर्वचजण मिळवतात, परंतु अनुभव हा स्वतःलाच मिळवावा लागतो. त्यासाठी स्वतःलाच प्रचंड परिश्रम करण्याची गरज असते. कारण आईच्या कुशीनंतर महाविद्यालयीन जीवनातच प्रेम, आपुलकी मिळते. प्राध्यापकांनी वेळ प्रसंगी आम्हाला घडविण्यासाठी आमच्या भवितव्यासाठी घेतलेल्या कठोर निर्णयाचा सुरवातीला राग आला परंतु आम्ही ज्यावेळी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांसमोर उभे राहतो त्यावेळी येथील शिस्त व केलेले संस्कार याचा खूप फायदा होतो हे लक्षात आले.’ असे उदगार काढले. यावेळी काहींच्या चेहऱ्यावर हसू तर काहींच्या चेहऱ्यावर आसू होते. हे स्पष्टपणे जाणवले. दिवसभर आचार विचारांची देवाण घेवाण करत संपला. कॉलेज जीवन संपल्यानंतर त्यांच्या जीवनात अनेक चढउतार आलेले विद्यार्थी देखील जणू ‘आठवण कॉलेजची, साठवण मैत्रीची’ कार्यक्रम हा कौटुंबिक कार्यक्रम समजून नटून थटून आले होते. दिवसभर आयोजीलेल्या कार्यक्रमात अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत काहींनी भाषण ठोकले तर विकास जावळे यांनी सोचेंगे तुम्हे प्यार करते नाही हे सुरेल गीत गायले. या मेळाव्यात, श्रीदेवी राठोड, सुधारणी बगली, वैशाली घोंगडे ,सुरेखा काटे, सुरेखा स्वामी, विमल माने, सुखदेव वलेकर, शशिकांत मल्लाडे, जाकीर पठान, विठ्ठल कोळवले, सुधीर सूर्यवंशी, नूरअहमद अन्सारी, प्रवीण साठे, किरण शिंदे, अरुण महापुरे, राजशेखर म्हेत्रे, अभिमान तांबडे, जगन्नाथ राजमाने, संजय सुडे, नाथा जावीर, सुधीर सूर्यवंशी, प्रकाश स्वामी,सुनिल मानकर, संजय पिचके, हमीद लालकोट, लक्ष्मण भोसले,दिलीप मोकाशी, सुभाष हासुरे, ताजोद्दिन जमातवाले, प्रवीण जाधव, दतात्रय कसबे, रवी अल्लापुरे, सुभाष शेद्बाल, रणजीत नागणे, मनोज जोशी, बसवराज बिराजदार, निसार कडेगावकर, शब्बीर अक्सापुरे, राजेंद्र माने , राजाभाऊ कळसकर, संतोष हलकुडे यांच्यासह बी.एड.महाविद्यालयातील १९९६ मधील जवळपास ९० माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. माजी विद्यार्थी मेळाव्यात सुनील साठे यांनी ‘फुलो का तारोका सबका कहना है..’ या गीताने उपस्थित विद्यार्थीनींचे डोळे पाणावले. तर प्रत्येक मित्राच्या भाषणानंतर समर्पक शेर- शायरी गझल याची जोड देत सूत्रसंचालन करून कार्यक्रमाला जिवंतपणा आणला तर उपस्थितांचे आभार संजय पाटील यांनी मानले.





0 Comments