पंढरपूर प्रतिनिधी) ‘टिव्ग सॉफ्टवेअर सोल्यूशन्स’ प्रायव्हेट लिमिटेड पुणे हि कंपनी सॉफ्टवेअर, व्यवसाय आणि बँकिंग सॉफ्टवेअर सेवा निर्मिती मध्ये अग्रेसर असून या कंपनीत पंढरपूर सिंहगडच्या ४ विद्यार्थ्याची मुलाखतीमधून निवड करण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली
भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील विद्यार्थी हा सक्षम बनला पाहिजे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध स्पर्धा आयोजित करण्यात येत असतात. या स्पर्धेतून विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळत असतो. यातूनच विद्यार्थ्याच्या ज्ञानात वाढ होत असते. या ज्ञानाच्या जोरावर विद्यार्थी स्वत:चे स्कील वापरून जगातील नामांकित कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी तसेच व्यवसाय करण्यासाठी सिंहगड मधील ज्ञानाचा फायदा होत असल्याचे दिसत आहे.

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयात विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षण दिले जाते. जगातील नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगडचा विद्यार्थी हा ज्ञानाच्या जोरावर निवडला जात आहे. विद्यार्थ्याची मुलाखत देण्याची पद्धत, शिस्तप्रियता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कंपनीला आवश्यक असलेले गुण सिंहगड मधील विद्यार्थ्याकडे दिसून आले. त्यामुळे महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील रचना आदाटे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील ऐश्वर्या देशपांडे, प्रविण बोरुळे आणि शुभम तांदळे आदी विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड करण्यात आली आहे.
‘टिव्ग सॉफ्टवेअर सोल्यूशन्स’ प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, ट्रेनिंग अॅड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. राजश्री बाडगे, डॉ. चेतन पिसे, डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा. सुभाष पिंगळे, प्रा. श्रीनिवास गंजेवार, प्रा.अल्ताफ मुलाणी, प्रा. अनिल निकम, प्रा. सोमनाथ कोळी, प्रा. दिपक कोष्टी, प्रा. सुर्यकांत पाटील, प्रा. अमित भादुले आदी सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.
-------------------------------------------------------
पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर Live "
तब्बल 40 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या
पंढरपूर Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर,
जि. सोलापूर 413304
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whats Up - 8308838111, 7083980165
Mobile- 8149624977
Mail- livepandharpur@gmail.com
0 Comments