राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांचे जयंतीनिमित्त अभिनव उपक्रम
पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूर येथील भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाने गरजु शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्याचे वाटप करुन राजर्षी छत्रपती शाहु महाराजांची जयंती अभिनव पध्दतीने साजरी केली. ‘‘समाजासाठी, समाजाच्या भल्यासाठी कार्यरत रहायचं समाजातील भावी पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी झटायचं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन आम्ही भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला क्रीडा मंडळाची स्थापना केली. आजतागायत ज्या पध्दतीने समाजकार्य केले त्याच पध्दतीने आमचे समाजकार्य सुरु असुन आज समाजातील गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करुन खर्या अर्थाने छत्रपती शाहु महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं.’’अशी माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशोर दंदाडे यांनी दिली.
दि. 26 जुन 2019 रोजी राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांची जयंती सबंध महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी झाली. पंढरीतील 197/ब, बौध्द नगर येथे भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाचे वतीनेही जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले होते. पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे निर्भया पथक प्रमुख पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे व पोलिस निरीक्षक शिरसाट यांच्या शुभहस्ते इयत्ता 1 ली ते 15 वी पर्यंतच्या गरजु शालेय विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सर्व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सर्वप्रथम राजर्षी छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
‘‘तळागाळातील वंचीत समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व या समाजातील भावी पिढी सुशिक्षीत व्हावी यासाठी खर्या अर्थाने प्रयत्न केलेले राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराजांना अपेक्षीत असेच कार्य आज भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाने केले आहे. असे उपक्रम राबविण्याची सध्या गरज आहे. पालकांनी आपल्या मुलांवर लहानपणापासुन लक्ष ठेवले पाहिजे, आपली मुले योग्य संस्कार व योग्य शिक्षण देऊन उच्चशिक्षीत अधिकारी बनवावेत. यासाठी मुलांना व्यसनापासुन व अपप्रवृत्तींपासुन दुर ठेवा. आपली भावी पिढी मनाने आणि मनगटाने मजबुत होण्यासाठी या पिढीला उच्चशिक्षण, सुसंस्कार यासोबतच व्यसनापासुन व वाईट संगतीपासुन दुर ठेवणे आवश्यक आहे. महापुरुषांच्या जयंती उत्सव काळात डॉल्बी वगैरेसाठी अनावश्यक खर्च टाळुन तोच पैसा समाजातील भावी पिढी घडविण्यासाठी व समाजातील प्रश्न सोडविण्यासाठी करा. असे मत पोलिस उपनिरीक्षक गजानन गजभारे यांनी व्यक्त केले. आंबेडकरी समाजातील भावी पिढी घडविण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलणार्या भीमज्योत सांस्कृतीक-शैक्षणीक कला व क्रीडा मंडळाचे कार्य चांगले असल्याचे गौरोद्गारही त्यांनी यावेळी काढले. यावेळी विलास जगधने सर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमास रमाई महिला मंडळाच्या सर्व पदाधिकार्यांसह बहुसंख्य महिला भगिणी उपस्थित होत्या. मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक मधुकर ढवळे, हरी खरे, दामु बंगाळे, प्रकाश ढवळे, राजु दंदाडे, विजय ढवळे, रमेश शिंदे, राजु बंगाळे, पांडुरंग धनवजीर, चंद्रकांत साबळे, मंडळाचे सदस्य जितेंद्र खरे, शरद दंदाडे, विठ्ठल बंगाळे, अंकुश धनवजीर, कपील वाघमारे, लखन ढवळे, अनिल वाघमारे, प्रकाश वाघमारे, शंकर खरे, नागनाथ गायकवाड, आण्णा ढवळे, विकास दंदाडे, लखन वाघमारे, महेश वाघमारे, विकी दंदाडे, शरद धनवजीर, प्रकाश दंदाडे, सतीश सोळंकी, नागनाथ कांबळे, पिंटु दंदाडे, भैया बंगाळे, अमर शिंदे, अजय ढवळे, अजय बंगाळे, भैया दंदाडे, पिनु दंदाडे, सौरभ दंदाडे, भैया गायकवाड, ॠषी साठे, विजय पवार, नारायण खरे, गणेश बनसोडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.






0 Comments