विद्यार्थ्यांनी कल्पनेतून साकारले यंत्र:
सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे कौतुक
पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील विद्युत विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्याअमित बागल, विशाल बनसोडे, ऋषिकेश पाटील, ओंकार पवार या विद्यार्थ्यांनी एकञ येऊन उर्जा बचतीचा प्रकल्प केला असुन सोलारवर चालणारे फांद्या कट करणारे यंञ तयार केले असुन या विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्युत विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी सोलर वर झाडाच्या फांद्या कट करणारे यंत्र चा प्रोजेक्ट महाविद्यालयातील प्रा. लोकेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले असुन हे यंत्र विद्युत पुरवठा वर चालणारे आहे, हे उपकरण बॅटरी पुरवठा वरती किमान आठ तास चालते. या यंत्राचा उपयोग बागेच्या सुशोभीकरणासाठी व रस्ता विभाजक यांच्यावरील झाडांच्या फांद्या कापण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरत असून जुन्या पद्धतीची तुलना करता हे यंत्र अत्यंत उपयुक्त असल्याचा विद्यार्थ्यांनी असल्याचा दावा केला आहे. हे उपक्रम तयार करण्यासाठी प्राचार्य डॉ कैलाश करांडेे, विद्युत विभागाचे विभाग प्रमुख प्रा. श्रीनिवास गंजेवार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. हे उपक्रम तयार करण्यासाठी अमित बागल, विशाल बनसोडे, ऋषिकेश पाटील, ओंकार पवार यांनी मोलाची कामगिरी केली आहे.
हा प्रोजेक्ट तयार करण्यासाठी प्राध्यापक एस. एस. दाढे यांचे मार्गदर्शन लाभले असुन प्रकल्प तयार केलेल्या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश कारंडे यांनी अभिनंदन केले.






0 Comments