पंढरपूर दि.27 ः सध्या पंढरपूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये चोर्यांचे प्रमाण वाढले असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात चोरांमुळे भयभीत झालेल्या ग्रामस्थांना धीर देण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलीस खात्याने गस्त वाढविणे अत्यंत गरजेचे आहे असे मत पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले.
पंढरपूर तालुक्यातील गादेगांव येथे शुक्रवार दि.26.07.2019 रोजी रात्रीच्यावेळी गांवामध्ये तसेच वाड्या-वस्त्यांवर 4/5 ठिकाणी चोर्या होऊन सोने, पैसे, दुचाकी वाहन अशा बाबी चोरीस गेलेल्या आहेत. सध्या दुष्काळी परिस्थिती असून त्यामध्ये अशा चोर्यांचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असल्यामुळे शेतकरी व ग्रामस्थ भयभीत व हवालदिल झालेला आहे.
तुर्तास झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांनी चोरांच्या प्रश्नाबाबत विधानभवनात आवाज उठविला होता. त्यावेळी सभागृहाला संबंधित खात्याने चुकीचा अहवाल सादर केल्यामुळे चोरांचे मनोधैर्य वाढल्यासारखेच झाले आहे.

त्यामुळे सध्या ग्रामीण भागामध्ये चोरांचा सुळसूळाट वाढलेला असल्यामुळे पोलीस खात्याने ग्रामीण भागामध्ये रात्रीच्यावेळी गस्त वाढविणे गरजेचे असल्याचे मत आमदार भारत भालके यांनी व्यक्त केले.





0 Comments