पंढरपूर (प्रतिनिधी) कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातून प्रथम वर्ष अभियांत्रिकी नंतर द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे सध्याच्या जगात स्पर्धा खूप आहे. या स्पर्धेच्या जगात तुम्ही टिकण्यासाठी करिअरचे स्वप्न बघुन ते स्वप्न यशस्वी करण्यासाठी त्या दृष्टिकोनाने मेहनत घेतली पाहिजे.
शैक्षणिक जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात घेतल्या जाणार्या विविध स्पर्धेत सहभागी होऊन स्वतःचे कौशल्य दाखवून दिले पाहिजे महाविद्यालय विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करत असते त्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभागी होणे त्यांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची असते. करिअरच्या दृष्टिकोनातूनच विद्यार्थ्यांनी अभ्यास केला पाहिजे. शिवाय स्वतःच्या करिअरचे स्वप्न विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच बघितल्यास यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांच्या स्वागत संमारभ या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रथम वर्षातून दुसर्या वर्षात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. या कार्यक्रमात शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. रविंद्र व्यवहारे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. जयश्री बाडगे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी आदींनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अतुल कुलकर्णी यांनी केले.





0 Comments