राज्यभरातुन विविध पक्षाच्या नेतेमंडळींनी भाजपामध्ये प्रवेश घेण्याचा सिलसिला सुरु असतानाच आज पंढरीतील श्रीविठ्ठल रुक्मिणी भक्त निवास समोरच्या मार्गावरील रस्ता दुभाजकावर एक अनोखा डिजीटल बोर्ड अनेकांचे लक्ष वेधुन घेत होता.
या फलकावर ठळकपणे भाजपा प्रवेश देणे आहे असा मजकुर आहे तर त्याखाली नियम व अटी मध्ये 1) ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य
2) भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती
3) सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव हवा असा मजकुर आहे.
त्याखाली विचारधारेची कुठलीही अट नाही,
आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्रशाखेत अॅडजस्ट करता येईल. असा मजकुर असुन
या फलकाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले असुन याबाबत सर्वत्र उलट-सुलट चर्चा सुरु आहे. हा फलक कोणी व कधी लावला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
यासंदर्भात पंढरपूर लाईव्हने पंढरपूर शहर पोलिस ठाणेत संपर्क साधला असता आज दि. 29 जुलै 2019 रोजी सायंकाळी साडे सहा वाजेपर्यंत तरी शहर पोलिस ठाणेत या फलकासंदर्भात कोणतीही माहिती किंवा कुणाचीही तक्रार वगैरे नसल्याचे समजले.
राजकीय क्षेत्रातील प्रत्येकाने आपापल्या शहरातील वातावरण शांततेचे व सलोख्याचे रहावे यासाठी असे प्रकार करु नयेत. असा दंडक ज्याचा त्यानं घालुन घेणं आवश्यक आहे. हे असे प्रकार पाहिल्यास मात्र विधानसभा निवडणुकीसाठी आणखी कांही काळ बाकी आहे. परंतु आत्तापासुनच राजकीय वातावरण तापु लागल्याचे दिसुन येत आहे.
______________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
-: संपर्क :-
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________

Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments