बोरिवलीच्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यात 155 उमेदवारांना नोकरी




शासनाच्या सवलतींचा लाभ घेणाऱ्या कंपन्यांनी
स्थानिकांना प्राधान्याने नोकरी द्यावी
- उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबईदि. 19 : उद्योग उभारण्यासाठी राज्य शासन उद्योगांना वीजपाणीभूखंड उपलब्ध करून देते. मैत्री व्यासपीठाद्वारे एका छताखाली सर्व परवाने मिळण्याची देखील सोय केलेली आहे. 

तेव्हा कंपन्यांनी राज्यातील स्थानिक मुलांना प्राधान्याने नोकरी देणे आवश्यक आहे. मुलांनी देखील कंपन्यांना आवश्यक असलेले कौशल्य अवगत करावेअसे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले.

राज्य शासनाच्या उद्योग विभाग व सीआयआयच्या वतीने बोरिवली येथे आयोजित करण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी आमदार प्रकाश सुर्वेआमदार विलास पोतनीस, उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे आदी उपस्थित होते.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________



यावेळी श्री. देसाई म्हणालेराज्य शासनाच्या उद्योग विभागाने बोरिवली येथे घेतलेला हा बारावा रोजगार मेळावा आहे. आतापर्यंत झालेल्या मेळाव्यांना तरुणांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे. 

हजारो मुलांना नोकऱीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. या मेळाव्यात सहभागी झालेल्या मुलांना देखील नोकरी मिळेपर्यंत पाठपुरावा केला जाईल. 

मुलाखतीसाठी आलेल्या तरुणांची तीन ते चार वेळा मुलाखती घेतल्या जातील. नोकरीची संधी मिळेपर्यंत मुलांनी कंपन्यांकडे पाठपुरावा करावा. 

नोंदणी केलेल्या शेवटच्या मुलाला नोकरी मिळेपर्यंत उद्योग विभाग प्रयत्न करेल. ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्याचे राज्य शासनाने धोरण असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. 

_________________________________________________


_________________________________________________


बोरिवली येथील बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्यासाठी १३०० तरुण-तरुणींनी ऑनलाइन नोंदणी केली होती. तर २००० जणांनी ऑफलाइन नोंदणी केली. त्यापैकी १२७५ जणांनी मुलाखती दिल्या.  

८६८ जणांच्या प्राथमिक मुलाखती झाल्या.  त्यातील १५५ जणांना ऑफर लेटर अदा करण्यात आले. एकूण ५२ कंपन्यांनी यात सहभाग नोंदविला. या भागात सुमारे सहा हजार नोकऱ्या उपलब्ध असल्याचे उद्योग विभागाने स्पष्ट केले.

उद्योग विभागसी आय आय आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलींद बोरीकर या मेळाव्याचे आयोजक होते. या मेळाव्याला सर्वसाधारण पदवीधरआयटीआय,अभियांत्रिकी,माहिती तंत्रज्ञान,  या विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी हजेरी लावली होती. महिला उमेदवारांनीही या मेळाव्याला बहुसंख्येने प्रतिसाद दिला.


_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments