साहित्यरत्न आण्णाभाऊं साठे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे युवक संघटना शाखा क्र.2 डॉ. आंबेडकर नगर संतपेठ पंढरपूर येथे क्रांतीशाहिर शितल साठे, विद्रोही कवी सचिन माळी व सहकलाकारांचा 'नवयान महाजलस’ हा प्रबोधनात्मक कार्यक्रम संपन्न झाला. नवयान महाजलसा या कार्यक्रमादरम्यान शाहिरांनी "वंदन तुम्हा आण्णाभाऊ, ये भाकरीचे माई, माझ्या पिला रे, आलं वादळ भीमा चं, मुक्तीसाठी काय हवे? संपविला देह जरी ,माझी मैना गावाकडं राहीली- माझ्या जिवाची होतीया काहिली" अशा भावपुर्ण क्रांतीरचना सादर केल्या. डफाच्या कडकडाटात क्रांतीशाहिर शितल साठे व विद्रोही कवी सचिन माळी यांनी सादर केलेल्या जोषपुर्ण अविष्काराला उपस्थितांनी भरभरुन दाद दिली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सुनील वाघमारे यांनी केले. यावेळी नगरसेवक अंबादास वायदंडे , होलार रिपब्लीक परिषदेचे अध्यक्ष एस.के. आयवळे (सर), वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अॅड. सुरेश कांबळे, जोशाबा टाईम्स चे संपादक श्रीकांत कसबे, डीएसएस चे अध्यक्ष दिलीप देवकुळे, नानासाहेब वाघमारे, राजाभाऊ नाईकनवरे, नाईक रणदिवे, विलास जगधने (सर) व पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
उपस्थित शाहीर व कलाकारांचा तसेच प्रमुख पाहुण्यांचा सत्कार नगरसेवक अंबादास वायदंडे यांनी केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाध्यक्ष बापू सकट, उपाध्यक्ष सुदाम खिलारे, भीमराव वाघमारे, दत्तात्रय खिलारे,संजय अडगळे, दत्तात्रय वायदंडे, नाईक रणदिवे, धनंजय खिलारे, दयानंद वायदंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments