श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये अतिरिक्त सुरक्षा दलांची नियुक्ती आणि दहशतवाद्यांकडून अमरनाथ यात्रेकरूंना लक्ष्य करण्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन राज्यात हालचाली गतीमान झाल्या आहेत. अमरनाथ यात्रा मुदतीच्या आधीच थांबवण्यात आली असून, काश्मीरमधून जवळपास ५ हजार पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. श्रीनगरसह गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग येथील वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये पर्यटक थांबले होते. त्यांना काश्मीर खोऱ्यातूनच बाहेर काढण्यात येत आहे. तसेच दुर्गा देवीची माछिल यात्राही थांबवण्यात आली आहे. ही यात्रा नुकतीच २५ जुलैला सुरू झाली होती जी ५ सप्टेंबरपर्यंत चालणार होती. मात्र, आता ही यात्रा थांबवण्यात आली आहे. देवीचे मंदिर असलेल्या किश्तवाड परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी, सरकारने दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करताना अमरनाथ यात्रेतील भाविकांना तातडीने काश्मीर खोऱ्यातून बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा
सरकारने भाविकांना अशा सूचना दिल्यामुळे आता राजकीय वातावरण तापले आहे. पीडीपीच्या अध्यक्ष मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारवर नागरिकांमध्ये भीती निर्माण केल्याचा आरोप केला आहे. काल मुफ्ती यांनी राज्यपाल मलिक यांची भेटही घेतील होती. त्यानंतर राज्यपालांनी राज्यातील जनतेला अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यात मोठ्या हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाली आहे. त्यानंतर अमरनाथ यात्रा थांबवण्याचा आणि काश्मीर खोऱ्यात अतिरिक्त कुमक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
पोलिस म्हणतात, ‘चिंतेचे कारण नाही’
काश्मीरच्या विधानसभेला कायद्यातील ३५अ कलमानुसार विशेष अधिकार देण्यात आला आहे. तसेच कलम ३७०नुसार राज्याला विशेष दर्जा प्राप्त झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ही दोन्ही कलमे हटविण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये हालचाली गतीमान झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यामुळेच उमर उब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. दरम्यान, श्रीनगरचे पोलिस उपायुक्त शाहिद चौधरी यांनी सुरक्षेच्या कारणास्तव चिंता करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.
____________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________






0 Comments