जेमतेम पावसामुळे पिके कोमेजली; शेतकरी चिंताग्रस्त



परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- परळी व अंबाजोगाई तालुक्यात जेमतेम पावसामुळे पिके कोमेजल्यामुळे व आठ दिवसपासुन पावसान पडल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाल्याचे चित्र दिसत आहे. दोन आठवड्यांपासून परिसरात पावसाने विश्रांती घेतल्याने पिके करपायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पोळा सणाच्या दोन दिवस असलेल्या खांदेमळणी असते. बैलांना नदी तलावात धुतले जाते. मात्र परिसरात जमिनीला पाणी नसल्याने भेगा पडल्या आहेत.


नदी-नाले कोरडेठाक पडल्याने त्याचाच फटका शेतकर्‍यांच्या सर्जा राजाच्या बैलपोळा सणाला बसल्याचे दिसून येत आहे. पोळा सण जवळ आल्याने व्यापार्‍यांनी परळीच्या बाजार पेठेत बैलांना सजविण्यासाठी लागणारे विविध साज आणले होते. मात्र शेतकर्‍यांनी खरेदी केली नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले. परिसरात मोठा पाऊस पडला नसल्यामुळे शेतकरी मेठाकुठीला आलेला आहे. बीड जिल्ह्यात सध्या दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्याने बाजरी, उडीद, मुग, तीळ, सोयाबीन ही पिके करपून हातची गेलेली आहेत.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


मोठा पाऊस न पडल्यामुळे तालुक्यातील लहान छोटे लघु प्रकल्प कोरडे ठाक पडले आहेत. पशुधनाच्या चार्‍याचा आणि पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनत चालेला आहे. बीड जिल्ह्याला नेहमीचाच दुष्काळ पडलेला आहे. कापुस गेल्यात जमा आहे. बीड जिल्ह्यात दुष्काळ पडतो हे तरी वर्ष चांगले जाईल या आशेवर शेतकरी होता. मात्र याही वर्षी पाऊसाने फार मोठा दगा दिला. पावसाळा शेवटच्या टप्प्यात आहे.

आजपर्यंत अत्यल्प पाऊस झालेला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची मोठे हाल आहेत. जिल्ह्यात टँकर सुरु आहेत. बाजरी, उडीद, मुग सोयाबीन पूर्णपणे करपून गेली आहे. सोयाबीनचा पीकविमा नव्वद हजार शेतकर्‍यांना मिळाला नाही. कापूसही जाण्याच्या मार्गावर आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने पिके करपायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

_________________________________________________


_________________________________________________

परळी व अंबाजोगाई तालुक्यातील महसूल क्षेत्रातील खरीप हंगामातील सोयाबीन, तुर, मुग, उडीद, ज्वारी तिळीसह विविध पिके महिनाभर खंडित झालेल्या पावसामुळे पिके वाळून जात आहेत. पण आज दुर्दैवाने हातातोंडाशी आलेला घासही निसर्गाच्या लहरीपणा मुळे जात आहे. खरीपाचे तर नुकसान झालेच पण दुर्दैवाने मोठा पाऊस नसल्याने नदी, ओढे नाले कोरडे फट पडले आहेत. परिसरात शेतकरी बैल पोळा व पाडवा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.


पण दोन ते तीन आठवड्यापासून परिसरात पाणी नसल्याने पिके हातातून जातात की काय या चिंतेमुळे शेतकरी व बैलांचा सण या आठवड्यात पाणी पडल्यास आनंदी होईल. तरी प्रशासनाने वाळत चाललेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी विठ्ठल साखरे यांनी केली आहे. शासनाने या अवघड अवस्थेतून शेतकर्‍यांना बाहेर काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात असे साखरे यांनी म्हटले आहे.

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments