आटपाडी ( प्रतिनिधी ) पावसाळ्यात समुद्राला वाहून जाणारे कृष्णा नदीचे पाणी आटपाडी सह दुष्काळी तालुक्यांतील तलाव ,बंधारे भरूण देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत पत्रकारांची बैठक आयोजीत करू अशी ग्वाही खासदार संजयकाका पाटील यांनी आज बोलताना दिल्याने आटपाडी तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने सुरू केलेले धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले .
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पावसाळयात दरवर्षी कृष्णेचे वाहून जाणारे पाणी दुष्काळी तालुक्यांना दिले जावे या मागणीसाठी पत्रकार संघाने आटपाडी तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले होते .
पावसाळ्यात दरवर्षी जुन ते सप्टेंबर या कालावधीत आटपाडीसह दुष्काळी तालुक्यात पाऊस कधी तुरळक होतो तर कधी होतच नाही या तालुक्यांची मदार परतीच्या पावसावरच असते . तो ही बेभरवशाचा आहे . दरम्यान जुन ते सप्टेंबर मध्ये दरवर्षी कृष्णा नदी दुथडी भरून वहात असते . ते पाणी समुद्राला जाते. या कालावधीत आटपाडी सह दुष्काळी तालुक्यातील तलाव ,बंधारे ,ओढे ,नाले , नदी कोरडी असते . पावसाळात कृष्णेतून वाहुन जाणारे पाणी टेंभू सह अन्य योजनांतून आटपाडी सह दुष्काळी तालुक्यातील बंधारे , तलाव शासनाने स्वखर्चाने भरावेत याची पाणीपट्टी माफ करावी असा धोरणात्मक निर्णय घ्यावा आणि दरवर्षी अंमलबजावणी करावी अशी मागणी पत्रकार संघाचे वतीने करण्यात आली . हे पाणी उचलण्याचे वीज बील टँकर ,चारा छावण्या ,दुष्काळ निवारण्याच्या इतर रवर्चापेक्षा कित्येक पटीने कमी असणार आहे . खासदार संजयकाका पाटील यांनी पत्रकार आंदोलकांशी दुरध्वनी वरून संपर्क साधला . ते म्हणाले सध्या पुरस्थिती गंभीर असून नियंत्रणात आल्यानंतर पत्रकारांसोबत मुख्यमंत्री महोदयांसमवेत बैठक घेऊ याप्रश्नी धोरणात्मक निर्णय घ्यावा यासाठी प्रयत्न करूं . यावेळी अहिल्यादेवी मेष महामंडळाचे अध्यक्ष ना . बाळासाहेब दोलतड़े यांनी मागणी न्याय आहे . पशुसंर्वधन मंत्री ना . महादेवराव जाणकर यांच्या मार्फत मुख्यमंत्री महोदयांकडे पोहोचवणेचे आश्वासन दिले.
या धरणे आंदोलना पाठिंबा देण्यासाठी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख ,आटपाडीच्या सरपंच सौ.वृषाली पाटील आले होते.यावेळी त्यांनी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना पावसाळयात वाहून जाणारे पाणी दुष्काळी भागाला देण्याचा धोरणात्मक निर्णय शासनाने घ्यावा, असे सरकारला विनंती करणारे ठराव ग्रामसभामधून करण्याचे आवाहन केले. या आंदोलनात मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नागेश गायकवाड, ज्येष्ट पत्रकार सादिक खाटीक , दैनिक लोकमतचे अविनाश बाड, दैनिक पुण्यनगरीचे सतीश भिंगे, दैनिक पुढारीचे प्रशांत भंडारे, दैनिक जनप्रवासचे सुशांत कासार, दैनिक तरुण भारतचे सुरज मुल्ला, दै. माणदेश एक्सप्रेस उपसंपादक धीरज प्रक्षाळे, पत्रकार तानाजीराव गायकवाड, अशोक पवार, सदाशिव पुकळे, गणेश जाधव, किशोर पुजारी, नंदकुमार निचळ, विक्रम भिसे , मुजू तांबोळी, सुरेश मोकाशी, मनोज कांबळे, बिपिन देशपांडे, सदानंद कांबळे,लतीफ मुलाणी,अल्लाउद्दीन मुलाणी ,सतिश इंगवले , सर्व पदाधिकारी आणि तालुक्यातील पत्रकारानी सहभाग घेतला होता.
_________________________________________________
_________________________________________________
आंदोलनाला जि . प . चे समाजकल्याण सभापती ब्रह्मदेव पडळकर, जि. प .सदस्य अरुण बालटे, मोहन रणदिवे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक बंडोपंत देशमुख,राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेबकाका पाटील , राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, पाणी चळवळीचे नेते आनंदराव पाटील, सावित्रीदेवी उद्योग समुहाचे नेते भारततात्या पाटील, जनता दलाचे तालुकाध्यक्ष आबासाहेब सागर, उदयोजक विनायक मासाळ, रासपाचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर, जिल्हाध्यक्ष उमाजी चव्हाण, शिवसेनेचे तालुकाप्रमुख साहेबराव पाटील, सिनेअभिनेते विजयकुमार देवकर, आटपाडीचे उपसरपंच प्रा.अंकुश कोळेकर, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव चवरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डाॅ. उन्मेष देशमुख आणि पदाधिकारी, भारिप बहुजन महासंघाचे साहेबराव चंदनशिवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश जाधव,अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष बापूसो गिडडे, माजी उपसभापती वसंतराव गायकवाड, अॅड . धनंजय पाटील, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे व्ही . एम. देशमुख, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शरद पवार, रिक्षा संघटनेचे तालुका अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, देवानंद जावीर, ईनुस इनामदार, नसीर मुलानी, खुदबुद्दीन शेख, महेंद्र तारळेकर, ज्ञानेश्वर जाधव, अजित कदम, विशाल देशमुख, प्रा. विजय शिंदे, ईश्वर शिंदे, भीमशक्तीचे जिल्हा अध्यक्ष मोहन खरात, प्रा. संताजी देशमुख, राहुल वाघमारे , अशोक लवटे,
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
आटपाडी तालुका प्राथमिक शिक्षक संघ थोरात गटाचे तालुका अध्यक्ष असिफ मुजावर, प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रसिक सपाटे, प्राथमिक शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष यशवंत गोडसे, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष यू.टी. जाधव, शिक्षक संघाचे उपाध्यक्ष संतोष बाड, तालुका अध्यक्ष श्याम ऐवळे, संजय कबीर,राष्ट्रवादीचे संभाजीराव पाटील, करगणीचे माजी उपसरपंच तुकाराम जानकर, राहुल गुरव,माध्यमिक शिक्षक संघटनेचे अशोक पाटील सर ,संजय देशमुख, अरुण गायकवाड, पोपट गायकवाड, आनंद शिरकांडे, ऋषिकेश देशमुख, पंचायत समितीचे सदस्य रूपेश पाटील, संभाजी देशमुख, राघव मेटकरी, युवराज देशमुख, श्रीरंग कदम, जीवन कासार, संभाजी गायकवाड, दत्तात्रेय कांबळे, ओमकार कोळी, धैर्यशील देशमुख, सुजित हिंगमिरे, मनोज देशपांडे, वेंकटेश दौंड, वृषभ गाडे, दीपक राक्षे, पांडुरंग कदम, सुभाष धनवडे, दिलीप कांबळे, बिरुदेव मोटे संभाजी पाटील, गणेश जाधव, मोहन बागल, धनाजी लेंगरे, संभाजी पिंजारी, संभाजीराव खरात, संतोष मोटे, नितीन देवकुळे, पप्पू सावंत, बळीराजा शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड, सागर जगदाळे, सोमनाथ जगदाळे, अनिकेत धनवडे, ऋषिकेश जगदाळे, अमोल जगदाळे, अतुल यादव, संजय मगर, जयंत पाटील, विलासराव खरात, सुरेश टोके, अशोक लवटे, अथर्व कुलकर्णी, शंकर गळवे, बापुसो मोरे, विलास कदम, शिवाजी ऐवळे , सुरेश कचरे, समाधान कचरे, मासाळवाडी चे माजी सरपंच बजरंग मासाळ, पोपट मासाळ, बिरा मासाळ, विजय देशमुख,प्रकाश जाधव, गणेश रावळ, सागर करंडे, शरद ढोकळे, सागर माने, नरेंद्र दीक्षित, योगेश स्वामी, चंद्रकांत कावळे, दिनेश देशमुख, सर्जेराव राक्षे, आनंदराव ऐवळे, विभूतवाडीचे सरपंच चंद्रकांत पाहुणे, विठ्ठल पडळकर, विष्णू अर्जुन, अनिल सूर्यवंशी, बंडोपंत हक्के, योगेश सावंत, हनुमंत केंगार, सागर कोळेकर, भारिप-बहुजन महासंघाचे अरुण वाघमारे, शिरीष देशपांडे, चंद्रकांत पोळ, गजानन शिरकांडे, कैवल्य शेटे, संभाजी शिंदे, महिपतराव पवार, भीमराव पाटील, दत्तात्रेय स्वामी आदीनी भेट देऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला.
यावेळी आंदोलकांची पाटबंधारे आणि महसुल विभागातील अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा झाली तसेच त्यांनी वरिष्टांशीही चर्चा घडवून आणली. पाटबंधारेचे शाखा अभियंता एल.बी.केंगार, तहसीलचे के.डी.भोसले यांच्यासह लिपिक एस.व्ही. व्हनमाने, एम.एस.बागवानही यावेळी उपस्थित होते.पत्रकाराच्या मागण्या आणि पुढील धोरणात्मक निर्णयासाठी पाठपुरावा करण्याचे लेखी पत्र त्यांनी दिले.
_________________________________________________






0 Comments