संशोधन हे समाजोपयोगी असावे- एनर्जी सिस्टीमचे डॉ. मोहन कोल्हे
पंढरपूर-‘सध्याच्या परिस्थितीमध्ये नवनवीन संशोधन हे समाजोपयोगी असावे स्वेरीतून अप्रतिम संशोधन होत आहे. स्वेरीच्या व्यवस्थापनाचे नियोजन उत्तम असल्यामुळे तंत्र शिक्षणाबरोबरच संशोधन क्षेत्रात देखील यश मिळत आहे. त्यामुळे स्वेरीमध्ये अभियंत्यांबरोबरच संशोधक देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.’ असे प्रतिपादन नॉर्वेचे आगदर विद्यापीठाच्या इलेक्ट्रीकल एनर्जी सिस्टीमचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मोहन कोल्हे यांनी केले. गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग व इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांसाठी एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात प्रमुख पाहुणे म्हणून आगदर विद्यापीठाचे इलेक्ट्रीकल एनर्जी सिस्टीमचे विभागप्रमुख डॉ. कोल्हे हे स्वेरीतील प्राध्यापकांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी संशोधनाविषयी ते बोलत होते. प्रारंभी प्रा. संदिपराज साळुंखे यांनी संस्थेविषयी माहिती देताना म्हणाले की, ‘संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली १९९८ साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाची जडण घडण, वार्षीक परीक्षेचा निकाल, कॅम्पस प्लेसमेंटमधून निवड होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी असलेली ‘कमवा आणि शिका’ योजना, मिळालेले बहुमान आणि संशोधनासाठी मिळालेला निधी, सुरु असलेल्या संशोधन प्रकल्पांची सविस्तर माहिती सांगितली. पुढे मार्गदर्शन करताना डॉ. कोल्हे म्हणाले की, ‘सोलार पॉवरच्या माध्यमातून निर्माण करण्यात येणारी वीज ही महावितरणला ‘स्मार्ट ग्रीड’च्या माध्यमातून दिली जाते. तसेच सध्याच्या युगात भरपूर प्रमाणात इलेक्ट्रोनिक्स उपकरणे वापरल्यामुळे काही हानी, नुकसान होत आहे ते कमी कसे करता येयील याबद्धल देखील मार्गदर्शन करून सोलार पॅनलची जोडणी कशी करायची याविषयी मार्गदर्शन दिले आणि स्वेरी अभियांत्रिकीच्या संशोधनासंबंधी माहिती जाणून घेतली.
_________________________________________________
_________________________________________________
यानंतर प्राध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. मोहन कोल्हे यांनी समर्पक उत्तरे देऊन संशोधनासाठी प्रेरित केले. यावेळी प्रा. अतुल सागडे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. दिप्ती तंबोळी, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे, प्रा. सचिन गवळी, प्रा. पी.के. मगदूम, प्रा. अनिता चिर्रा, प्रा. शुभांगी कंगळे, प्रा. श्रवणकुमार अक्कीरेड्डी, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदिपराज साळुंखे यांनी केले तर प्रा. यशपाल खेडकर यांनी आभार मानले.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments