पंढरपूर (प्रतिनिधी):- चंद्रभागेला पुर आला असुन पुरामुळे चंद्रभागेने धोक्याची पातळी गाठली आहे. नदीकाठच्या नागरी वस्ती असलेल्या कांही भागात पाणी शिरल्यामुळे येथील नागरिकांचे अन्यत्र स्थलांतर करण्यात आले आहे.उजनी पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने उजनीची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. उजनी व वीर धरणातील पाणी भीमा नदीपात्रात सोडल्याने चंद्रभागा नदी दुथडी भरुन वाहत आहे.
चंद्रभागेच्या नवीन पुलावरही पाणी आले असुन हा पुल पाण्याखाली गेला आहे.
चंद्रभागेने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता 444.20 एवढे धोक्याची पातळी गाठली असून चंद्रभागेत. 149200 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे पुढील काही तासात हा विसर्ग वाढणार असल्याने येथील नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
मंगळवारी पहाटे पासूनच नदीकाठच्या व्यास नारायण झोपडपट्टी व अंबिकानगर झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली. येथील जवळपास 500 कुटुंबांचे येथील नागरिकांना 65 एकर परिसरातील यात्री निवासस्थानी स्थंलातर करण्यात आले आहे.पंढरपुरातील पूर परिस्थिती निर्माण झाली आहे .
चंद्रभागेच्या नदीकाठी प्रथम ज्या भागामध्ये पाणी शिरते. अशा व्यासनारायण झोपडपट्टी व आंबेडकर नगर येथील नागरिकांना स्थलांतरीत होण्याबाबत प्रशासनाकडून सूचना करण्यात आली आहे. तसेच गोपाळपूर येथील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच नवीन पुलावर पाणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पंढरपूर मंगळवेढा रस्ता बंद करावा लागणार आहे.
_________________________________________________
_________________________________________________
मंगळवारी पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास वीर धरणातून नीरा नदीमध्ये 1लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू होता. हा विसर्ग संध्याकाळी 5.30 वाजता 1 लाख 49 हजार झाला आहे.
नीरेतून 1 लाख 10 हजार क्युसेक व उजनी धरणातून 70 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याचा एकूण विसर्ग 1 लाख 90 हजारांच्या आसपास राहणार आहे.चंद्रभागेने मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता 444.20 एवढे धोक्याची पातळी गाठली ओलांडली आहे. चंद्रभागेत 149200 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. मंगळवारी रात्री पंढरपुरातील काही भागात पाणी शिरण्यास सुरुवात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________













0 Comments