पंढरपूर- चेतना बहुउद्देशीय संस्था संचलित वनराई ग्रुप पंढरपूर तर्फे कासेगाव (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलच्या भव्य प्रांगणात ५६ वेगवेगळ्या प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण साजरे करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गजानन गजभारे उपस्थित होते. चेतना बहुउद्देशीय संस्थेच्या महिला कार्यकर्त्या वर्षा चेंकेश्वरा व वर्षा पाटील यादेखील उपस्थित होत्या. या कार्यक्रमाप्रसंगी चंकेश्वरा म्हणाल्या की,‘वृक्ष,झाडे आपणास ऑक्सिजन देतात. ऑक्सीजन शिवाय आपण जगू शकत नाही. वृक्ष आपल्याला सावली देतात, पशुपक्षी या सावलीत रखरखत्या सूर्यापासून आसरा घेतात. वृक्षाची मूळे जमिनीची धूप रोखतात, विविध प्रकारचे वृक्ष, झाडेझुडपे, वनस्पती, आपल्याला अन्नधान्य, फळे,भाज्या, देतात. औषधी वनस्पती, कंदमुळे यामुळे बऱ्याच रोगावर उपाय होतो.’ वर्षा पाटील म्हणाल्या की, ‘ही झाडे आपल्याला रबर सुद्धा देतात ज्याने टायर बनवले जातात.
शुभेच्छुक-
डिव्हीपी धाराशिव साखर कारखाना उस्मानाबाद युनिट नं १ वसंतराव दादा पाटील स. साखर कारखाना देवळा नाशिक युनिट नं २ व्यंकटेश्वरा साखर कारखाना नांदेड युनिट नं ३,डिव्हीपी स्क्वेअर मल्टीप्लेक्स माॅल पंढरपूर, हाॅटेल विठ्ठल कामत काॅलेज रोड पंढरपूर, समृद्धी ट्रॅक्टर्स पंढरपू
______________________________________
दळणवळण होते, व्यवहार वाढतो. ही झाडे आपणास घर, दुकाने बांधायला लाकूड देतात. वृक्ष मानवी जीवनचक्राचा एक अविभाज्य घटक आहे. म्हणून वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे. प्राचार्या डॉ. जयश्री चव्हाण म्हणाल्या की, ‘वृक्ष आपल्याला सर्वस्व देतात पण आपण त्याची परतफेड वृक्ष तोडून करतो. आता ही वृक्षतोड एवढी सामान्य झाली आहे, की याबद्दल आपल्याला काहीच वाटत नाही. आपली ही वागणूक एके दिवशी आपल्याला खूप मोठ्या संकटात पाडणार आहे.’ असे सांगून वाढत्या वृक्षतोडीबद्धल चिंता व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गजानन गजभारे यांनी स्वतः विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केले. चेतना बहुउद्देशीय संस्थेने लोटस इंग्लिश स्कूलला भेट देऊन परिसरात वृक्षारोपण केल्याबद्धल संस्थेचे सचिव डॉ.बी.पी.रोंगे, अध्यक्ष बी.डी. रोंगे, उपाध्यक्ष एच.एम.बागल, खजिनदार दादासाहेब रोंगे यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक संपत लवटे, दादासाहेब पटेल, मयूर वागज, आदीक्ष गायकवाड, ज्ञानेश्वर वायदंडे, सचिन निकम, शिक्षका आस्मा शेख, अस्मिता घोलप, महिला पोलीस वर्ग, पालक व विद्यार्थी उपस्थित होते
_________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________







0 Comments