वाहतुक बंद- महत्त्वाचे सर्व पुल पाण्याखाली.. पंढरपुरमधील सखल भाग जलमय


    पंढरपूर (प्रतिनिधी):- रात्रीपासून भीमा नदी ही धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत असल्यामुळे  आज सकाळपासून अहिल्यादेवी ब्रिज आणि नवीन पूल या ठिकाणावरून वाहतूक बंद करण्यात आली आहे. अशी माहिती पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.
उजनी  धरण पाणी पातळी
दि :07/08/19
दुपारी 12.00वा 
पाणी पातळी : 496.820
एकूण साठा : 3316.66
उपयुक्त साठा : 1513.85
टक्केवारी :  +99.78%
बंडगार्डन विसर्ग :32843
दौंड विसर्ग : 114861
कालवा : 2500
बोगदा : 1200
नदी : 150000
वीज निर्मिती :1600
पाऊस :  00 मी.मी.
एकूण पाऊस:122 मी.मी.


उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे पाऊस नसुनही पंढरपुर तालुक्यातील भीमा काठी महापुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून सखल भागात पाणी शिरल्याने अनेक नागरिकांना आपले घर सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे लागत आहे. नगरपरिषदेच्या वतीने स्थलांतरणासाठी नागरिकांना ट्रॅक्टर, ट्राॅलीची व टेम्पोची सोय केली असुन ६५ एकर परिसरात रहाण्याची व्यवस्था केली आहे.

गोपाळपूर येथील पुल पाण्याखाली गेला असुन मंदिरासमोर पुराचे पाणी शिरले आहे. पंढरपुरमधील विप्रदत्त घाटावरही पुराचे पाणी आले आहे.

प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, नगराध्यक्षा सौ.साधनाताई भोसले, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, समाजसेवक भाऊसाहेब शिंदे-नाईक, समाजसेवक धर्मराज घोडके यांनी नदीकाठच्या नागरिकांना भेट देऊन घरे खाली करण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले. स्थलांतरीत झालेल्या नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रयत्न करत आहे.

_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________

इसबावी येथील मलपे ओढ्यात पुराचे पाणी शिरले असुन अक्षय बंगलोज शेजारी, शिवकिर्ती नगर येथील नागरिकांना भेट देऊन प्रभाग क्र. १२ च्या नगरसेवकांनी पुरपरिस्थितीची माहिती देऊन सतर्क रहाण्यास सांगितले.


ही पंढरपूर तालुक्यातील गावे भीमा नदीकाठावर आहेत.


_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments