स्वेरीच्या स्थापना दिनानिमित्त गुणवंत पाल्यांचा सत्कार
पंढरपूर- ‘आज माणूस नुसता पैशाच्या मागे धावतो आहे. त्यामुळे माणसाला माणसाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे नाते संबंधात दरी निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. गरीब, श्रीमंत असा फरक अधिक ठळक होत आहे.
जर श्रीमंतांची मुले ज्या शाळेत शिक्षण घेताहेत त्याच शाळेत गरीब शेतकऱ्यांची मुले शिक्षण घेऊ लागली तरच खऱ्या अर्थाने भारत विकासाकडे झेप घेत आहे असे म्हणावे लागेल.’ असे भावनिक उदगार प्रसिद्ध लेखक, पत्रकार, किर्तनकार ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
स्वेरीच्या बावीसाव्या स्थापना दिनानिमित्त सायंकाळी ‘उजळावया आलो वाटा’ या विषयावर आयोजिलेल्या किर्तनात ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर अप्रतिम वाणीने विचार सांगत होते. सायंकाळच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या हस्ते झाले.
प्रारंभी ‘स्वेरी’परिवारातील सदस्यांच्या पाल्यांच्या कलागुणांचा गौरव केला. यामध्ये सिद्धी शितोळे, हर्षवर्धन शिंदे, प्रणाली पवार, स्वराज तळवलकर, अनिश तांबोळी, राजआर्या साळुंखे, तनिशा मोरे, प्रीती काळे, मयुरेश बागल, श्रेया मोहोळकर, महेंद्र देवधर, आराध्या रानगट, कार्तिक कुलकर्णी, साईकिरण धरणे यांचा भेटवस्तू देवून सत्कार केला.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
कार्यक्रमाचे उदघाटक चेअरमन काळे म्हणाले की, ‘रोंगे सर हे सर्व सामान्य घरात जन्माला येवून गरीब मुलांच्या शिक्षणासाठी सातत्याने परिश्रम घेत आहेत. त्यांचा योग्य पद्धतीने शिक्षण देण्यातील सातत्य, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळणारी प्रेरणा ही कार्ये अभिमानास्पद आहेत.’ असे सांगितले. यानंतर जेष्ठ गायिका अनुराधा मराठे यांच्या बरोबर डॉ. सुलभा आपटे यांनी मुक्त संवाद साधून मराठे यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी श्रीमती मराठे यांनी ‘बुगडी माझी सांडली गं ..’, ‘सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी ....’ या चिमण्यांनो परत फिरा...’ अशा अनेक जुनी मराठी भावगीते सादर केली. त्यांच्या अनेक भावगीतांनी सायंकाळ उजळून निघाली. ह.भ.प. सोन्नर महाराज यांच्या कीर्तनाने आणि श्रीमती मराठे यांच्या भावगीताने स्वेरीचा बावीसावा स्थापना दिन संस्मरणीय राहिला.
यावेळी आश्रयदाते उद्योजक सी.पी. बागल, भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, नरसाळे सर, स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे,अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त डी. एस. सालविठ्ठल, माजी उपाध्यक्ष व विश्वस्त एन.एस. कागदे, विश्वस्त बी.डी. रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त प्रा. सुरज रोंगे, पत्रकार, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा आदी क्षेत्रातील मान्यवर तसेच स्वेरी अंतर्गत असलेल्या महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी केले तर रात्री स्नेहभोजनाने स्थापना दिनाचा समारोप झाला.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________





0 Comments