पंढरपूर– सोलापूर येथील केगावच्या सिंहगड पब्लिक स्कूल या ठिकाणी घेण्यात आलेल्या विविध नृत्य स्पर्धेत कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संचलित, लोटस इंग्लिश स्कूल मधील इयत्ता तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. त्यामुळे पंढरपुरच्या पंचक्रोशीत त्या विजेत्या चिमुकल्यांचे कौतुक होत आहे.
शहीद जवान वीर पुत्र मेजर कुणाल गोसावी यांना श्रद्धांजली अर्पीत करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. या नृत्यस्पर्धेत सी.बी.एस.सी. बोर्डाच्या आठ शाळेने सहभाग घेतला होता. यामध्ये देशभक्तिपर समूहगीत, देशभक्तीपर पेट्रोटिक नृत्य प्रकार सादर केले होते. यामधील इयत्ता तिसरी व पाचवीच्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक नृत्य सादर केले. हे नृत्य पाहून सर्व कार्यक्रमाच्या परीक्षकांनादेखील स्पर्धकांची तयारी पाहून निकालासाठी तारेवरची कसरत करावी लागली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी रंगमंचावर जय हिंद,वंदे मातरम,भारत माता की जय,असा देशभक्ती मय वातावरण निर्माण झाले. हे नृत्य सादर करताना भारतीय सैनिकांच्या वेशभूषेत आपली कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये असलेली प्रचंड चुरस, उर्जा, देशभक्तीपर गाण्यावर सादर होणारे एकाहून एक बहारदार नृत्याविष्कार आणि प्रत्येक सादरीकरणाला रसिकांकडून मिळणारी उस्फूर्त दाद अशा जल्लोषमय वातावरणात सोहदया महोत्सवाची रंगत आणखीनच वाढली.
लोटसच्या विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक आल्याबद्दल स्कूल मधील विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.या नृत्य कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून सिंहगड पब्लिक स्कूलचे चेअरमन संजय नवले, प्राचार्य सुझान थॉमस, प्राचार्य स्मिता नवले आणि लोटसच्या प्राचार्या डॉ जयश्री चव्हाण यांची निवड करण्यात आली होती.
_________________________________________________
_________________________________________________
यावेळी प्राचार्या.डॉ. चव्हाण म्हणाल्या की, ‘या सोहदया कॉम्प्लेक्स नृत्य स्पर्धेचा मुख्य उद्देश तो म्हणजे मुलांच्या सुप्त गुणांना वाव देणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, रंगमंचावरील सादरीकरण करताना होणारी भीती मोडणे, रंगमंचावर संवाद साधण्यासाठी धाडस निर्माण करणे हा आहे.
या स्पर्धेमुळे लोटस इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला म्हणून संस्थेचे सचिव डॉ.बी.पी रोंगे, विश्वस्त दादासाहेब रोंगे, अध्यक्ष बी.डी.रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी या नृत्य स्पर्धा पार पाडण्यासाठी क्रीडाशिक्षक मयूर वागज, शिक्षिका आस्मा शेख, सुप्रिया अंकुशराव यांच्यासह इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments