स्वेरीमध्ये माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली
स्वेरीत भाजपचे जेष्ठ नेते तथा माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना श्रद्धांजली वाहताना स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, डॉ. पी.एस.कचरे, डॉ. अभय उत्पात, प्रा. एम.एम.पवार आदी.
पंढरपूरः- भारताचे माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली हे राजकीय वर्तुळात बहुआयामी व चतुरस्त्र व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे. ते भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ नेते होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कायदे आणि जलवाहतूक मंत्रालय विभागाचा कार्यभार पहिला होता. २००९ साली त्यांनी राज्यसभेतील विरोधीपक्षनेते म्हणून उत्तम कार्यभार सांभाळला. त्यांच्या अकाली निधनाने भारतीय राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कदापी भरून येणार नाही.’ असे प्रतिपादन स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात माजी केंद्रीय अर्थमंत्री, कायदामंत्री, जलवाहतूक मंत्री अशी विविध पदे उत्तमरित्या भूषविलेले अरुण जेटली, यांना स्वेरी परिवाराच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
प्रारंभी अरुण जेटली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पुढे बोलताना सचिव व प्राचार्य रोंगे म्हणाले की, ‘दिलेली जबाबदारी सांभाळून राजकीय नेत्यांसमोर आपल्या कुशल कार्याने एक आदर्श ठसा उमटविणारा नेता अरुण जेटली यांनी उभा केला. अशा बहु आयामी नेत्याच्या अकाली जाण्याने राजकीय व अर्थकारणाशी निगडीत क्षेत्राला खुप मोठा धक्का बसला असून असा अभ्यासू नेता पुन्हा कदापी होणे नाही.’ अशा शब्दात सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी. संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, जेष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी.एस.कचरे, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम.एम.पवार, प्रशासन अधिष्ठाता डॉ. रणजीत गिड्डे, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सचिन सोनवणे, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.करण पाटील, ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेण्टचे अधिष्ठाता डॉ. माधव राऊळ, प्रा. धनंजय कुंभार, प्रा. दिग्विजय रोंगे, प्राध्यापक वर्ग,शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments