पंढरपूर-महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे.त्याचाअंतर्गत मराठा समाजातील व्यवसाय, उद्योग करू ईच्छित असनाराला कर्जाची(व्याज परतावा)सोय केली असून त्या कर्जाची हमी, महामंडळाने,महाराष्ट्र शासनाने घेतलेली असून देखील व तसे परिपत्रक(GR)सर्व बँकांना दिले आहे. तरीही बँका जाणिवपूर्वक त्रास देत आहेत,लोकांना हेलपाटे देणे, आम्हाला GR आला नाही, हि योजना आमच्या बँकेत नाही, हया योजनेचे पैसे आले नाहीत,अशा प्रकारे उडवाउडवीची उत्तरे देतात,लोक सहा-सहा महिने हेलपाटे मारून ही दखल घेतली जात नाही .यामध्ये महाराष्ट्र बँक शाखा सुस्ते,विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा गुरसाळे,शाखा भोसे,शाखा कासेगांव यांच्या सह विविध बँकेचा समावेश आहे.
________________________________________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
________________________________________________________________________________
या सर्व बँकांना कंटाळून लोकांनी मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण यांच्याकडे तक्रारी केल्या,याची दखल घेऊन मराठा महासंघाच्या वतीने अर्जुनराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसह पंढरपूरचे तहसीलदार मधूसुदन बर्गे साहेब यांना बँकांना समज देण्यात यावी या मागणीचे निवेदन देताना, जर आमच्या मागणीची दखल नाही घेतली तर मराठा महासंघाच्या वतीने महिलांसह तिव्र आंदोलन करू व त्यास प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा देण्यात आला.निवेदन देताना मराठा महासंघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष अर्जुनराव चव्हाण,जिल्हा सचिव गुरूदास गुटाळ,पंढरपूर तालुका अध्यक्ष संतोष जाधव,शहराध्यक्ष अमोल पवार,शहर संघटक काका यादव,विद्यार्थी आघाडी तालुका अध्यक्ष प्रणव गायकवाड,विद्यार्थी आघाडी तालुका कार्याध्यक्ष प्रशांत जाधव,महिला आघाडी तालुका अध्यक्षा प्रा रजणीताई जाधव,तालुका उपाध्यक्षा सौ प्रभावती गायकवाड,शहराध्यक्षा डाॅ संगीता पाटील,शहर उपाध्यक्षा थोरवत मॅडम,युवती आघाडी तालुका अध्यक्षा अॅड प्राजक्ता शिंदे यांच्या सह उद्योगजक महिला,युवती,युवक मराठा महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित.
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
________________________________________________________________________________
Contact :- 9421068300 , 9921715300

________________________________________________________________________________
________________________________________________________________________________

0 Comments