पंढरपूर (प्रतिनिधी):- आज दि. 15 ऑगष्ट 2019 रोजी भारतीय स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधनाच्या दिवशीच पर्ंपूर तालुक्यातील एक महिला भगिणी न्यायासाठी पंढरपूर तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेली आढळुन आली.

आज पंढरपूर तहसिल कार्यालयात भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्तचा शासकीय ध्वजारोहण समारंभ पार पडत असतानाच तहसिल कार्यालयाच्या समोरच पंढरपूर तालुक्याच्या सुपली येथील अर्चना आनंदा यलमार या महिला भगिणी आमरण उपोषणासाठी बसलेल्या आढळल्या. उपोषणकर्त्या महिला भगिणीची भेट घेऊन तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी निवेदन स्वकिारले व अधिक चौकशी केली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पंढरपूर लाईव्हने याबाबत अधिक माहिती जाणुन घेतली असता अर्चना यलमार व त्यांचे वडील शामराव सुदाम लाडे यांच्यामध्ये मे. सिव्हील कोर्टामध्ये जमीनीसंदर्भात वाद सुरु आहे. सदर दाव्यात कोर्टाने सदरची जमीन शामराव सुदाम लाडे यांनी विक्री करु नये असा आदेश केला आहे. परंतु असे असतानाही दुय्यम निबंधक वर्ग-1 पंढरपूर यांनी दि. 9 जुलै 2019 रोजी सदर जमीनीचा बेकायदेशीर दस्त नोंदविला आहे. असा आरोप करत सदर जमीन विक्रीचा आदेश रद्द करण्यात यावा व दस्त नोंदणी करणार्या अधिकार्यांविरुध्द कारवाई व्हावी यासाठी आपण स्वातंत्र्यदिनी उपोषणास बसलो असल्याची माहिती अर्चना आनंदा यलमार यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली आहे.
_________________________________________________
_________________________________________________
न्यायालयाच्या मनाईचा आदेश असलेली कागदपत्रे उपोषणकर्त्यांनी जोडलेली नाहीत. जर सदर जमीनीसंदर्भात न्यायालयाच्या मनाई आदेशाची प्रत प्राप्त झाली तर सदर विक्री रद्द करु. अशी माहिती तहसिलदार मधुसुदन बर्गे यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
सदर महिलेला उपोषणाला बसलेले पाहुन अनेक सामाजिक कार्यकर्तेही याठिकाणी अधिक चौकशीसाठी आले होते. कोर्टाच्या आदेशाची प्रत नसल्यामुळे तुम्ही उपोषण सोडा आदेशाची प्रत घेवुन या तहसिलदारसाहेब तुम्हाला न्याय देतीलच वगैरे सल्ला सदर महिलेला दिला जात होता. तर काहीजण न्याय मिळेपर्यंत उपोषण सोडुच नका असाही सल्ला देताना आढळत होते. या प्रकरणाबाबत सत्य-असत्य काहीही असो, परंतु आज भारतीय स्वातंत्र्यदिनी व राखी पौर्णिमेच्या दिवशीच तहसिल कार्यालयासमोर एका महिला भगिणीचे न्यायासाठी सुरु असलेले हे आमरण उपोषण नक्कीच क्लेशदायक वाटते.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments