पंढरपूर प्रतिनिधि :- नीरा कालव्याच्या पाणी वाटपात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याने पंढरपूर तालुक्यातील अनेक गावे पाण्यापासून वंचित राहिली आहेत. नियोजनाचा अभाव असल्यामुळे वीर धरणातून लाखो क्यूसेक्स पाणी भीमा नदीतून वाहून गेले.
तालुक्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती आहे. अधिकारी केवळ पाणी देण्याचे आश्वासन देत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोनके गावचे सरपंच आरपीआयचे नेते दीपक चंदनशिवे यांनी ग्रामस्थांसह थेट मुंबई मधील आजाद मैदानावर काल मंगळवार पासून धरणे आंदोलन सुरु केले आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या आंदोलन स्थळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाणी सोडण्याचे आश्वासन दिले मात्र चंदनशिवे यांनी पाणी सोडल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे.
आज पाटबंधारे मंत्री गिरीष महाजन यांच्याशी या विषयावर बैठक होण्याची शक्यता आहे. मुंबईतील धरणे आंदोलनात अशोक पवार, संजय कारंडे, सुधाकर खरात, सर्जेराव जाधव आदीसह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले आहेत.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments