पंढरपूर दि.१६. शुक्रवार :- श्रीविठ्ठल एज्युकेशन एन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट ( 'स्वेरी ') संचलीत अभियांत्रिकी महाविद्यालय ( collage of Engineering) पंढरपूर. या ठिकाणी वारकरी संप्रदाय पाईक संघ व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ धर्माचार्य संपर्क पंढरपूर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 'सत्संगातून राष्ट्रभाव जागृती अभियान ' या उपक्रमाचा प्रारंभ दि. १६ रोजी करण्यात आला. येत्या वर्षभरात या माध्यमातून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संतसाहित्य, संतचरित्र द्वारा भारतीय संस्कृती ची ओळख, मानवी जीवन मुल्ये, प्रामाणिकपणा, आदर्श आचार -विचार , सुदृढ शारिरीक व मानसिक आरोग्य, आपल्या संस्कृती व राष्ट्राविषयी अभिमान निर्माण करण्याबरोबरच कणखर मनोधैर्य असणारे सुजाण भारतीय नागरिक बनवण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्यात आली. संपूर्ण वर्षभर महाविद्यालयातील जवळपास ४००० विद्यार्थी याचा लाभ घेणार आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रा.स्व. संघाचे धर्माचार्य संपर्क पंढरपूर विभाग प्रमुख श्री .संतोषजी दामोदरे यांनी केले.
त्यानंतर महाविद्यालयाचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे सर यांनी सत्संगतीतीतून जीवनाचा कसा कायापालट होतो या विषयी आपले स्वानुभव कथन करत या अभियानाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मनोगत व्यक्त केले.
या कार्यशुभारंभ प्रसंगी , वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष देवव्रत (राणा)महाराज वासकर, व राष्ट्रीय प्रवक्ते ह.भ.प.
या कार्यक्रमास सर्वश्री ह.भ.प.भागवत महाराज चवरे , निवृत्ती महाराज नामदास, नागेश महाराज बागडे ,चैतन्य महाराज देहुकर तसेच सुत गिरणीचे संचालक अभिषेक कांबळे,पं.समिती माजी सभापती श्रीमंत मस्के , प्रा.उत्पात, प्रा.लेंडवे, व महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
रामकृष्ण हनुमंत महाराज वीर यांनी सदर अभियाना अंतर्गत घेतले जाणारे विषय व या अभियानाची आवश्यकता संतविचारांच्या द्वारा मांडून यासंदर्भात प्राथमिक मार्गदर्शन केले. या सर्व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी केले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments