पंढरपूर – ‘एचआयव्ही’ ग्रस्तामध्ये महाराष्ट्र हा देशात दुसऱ्या स्थानावरती असून सोलापूर जिल्हात ‘एचआयव्ही’चे प्रमाण एक टक्का आहे. ही परिस्थिती अशीच वाढली तर पंढरपूर तालुक्याची स्थिती अधिक
भयावह होवू शकते. म्हणून युवकांनी ‘एचआयव्ही’ विषयी अधिक माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.
स्वामी विवेकानंदानी घालून दिलेला आदर्श युवकांनी पाळणे अत्यावश्यक बनले आहे.” असे प्रतिपादन पंढरपूर उपजिल्हा ग्राणीण रुग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी डॉ. सयाजी गायकवाड यांनी केले. रयत शिक्षण संस्थेच्या येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रक सोसायटी, जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध कार्यालय सोलापूर व उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर्राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून ‘एडस जनजागृती’ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
यावेळी डॉ. गायकवाड बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक भोईटे हे होते. यावेळी पुरुषोत्तम कदम यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. सयाजी गायकवाड पुढे म्हणाले की, “असुरक्षीत यौन संबंध, एचआयव्ही बाधीत सुई, मातेकडून बाळाला विषाणूचे संक्रमण या माध्यमातून एडसचे संक्रमण होते. विद्यार्थ्यांनी चंगळवादापासून दूर राहिले पाहिजे. स्वामी विवेकानंदानी ब्रह्मचर्य, ज्ञाननिष्ठा व शुध्द चारित्र्याच्या बळावर राष्ट्रनिर्माणाची संकल्पना मांडली. आजच्या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंदाचा आदर्श जीवनात स्वीकारला तर त्याला कोणत्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज राहणार नाही. शिक्षणाबरोबर शुध्द चारित्र्य आणि नैतिकता पाळणे गरजेचे आहे.”
_________________________________________________
_________________________________________________
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. अशोक भोईटे म्हणाले की, “एडस हा अतिशय भयानक आजार आहे. जीवनात झालेली एक चूक माणसाला आयुष्यभर यातना भोगायला लावते. एडसच्या आजाराची लागण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्याची पूर्वप्रतिबंधाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.”
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. दादासाहेब हाके यांनी केले. या कार्यक्रमास प्रा. डॉ. एस. पी. शिंदे, प्रा. सी. एन. काळे, प्रा. सुभाष कदम, प्रा. अलका घोडके, सिनिअर विभागातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सारिका भांगे व विशाल माने यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार डॉ. फैमिदा बिजापुरे यांनी मानले.
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments