पंढरपूर-राज्यात गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. यामुळे संसारिक, आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून त्यांना सर्व ठिकाणाहून मदतीचा ओघ येत असतानाच आपल्या शैक्षणिक कार्याबरोबर सामाजिक कार्याचा देखील ठसा उमटविलेल्या स्वेरीच्या राष्ट्रीय सेवा योजनेने देखील मदतीचा हात पुढे केला असून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरी कॅम्पस इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांच्या सहकार्याने रा. से. योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. रंगनाथ हरिदास व प्रा. सहदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्तांना जवळपास एक लाख रुपयांपर्यंतच्या रकमेचे दैनंदिन जीवनात अत्यंत आवश्यक असणारे शैक्षणिक साहित्य, कपडे, संसारोपयोगी साहित्य, कडधान्ये आदी मदत म्हणून पूरग्रस्तांना पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत पोच केली असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सूचनेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे पुरग्रस्तांना रा.से. योजनेतील जवळपास २०० विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी व पदविकेचे विद्यार्थी व प्राध्यापकांकडून असे मिळून तांदूळ (५०० किलो), पीठ (३०० किलो) गहू (३३ किलो), ज्वारी (१० किलो), साखर(१०३ किलो), बेसन पीठ (८० किलो), तेल (९० किलो), मुग दाळ(३० किलो), तुरदाळ (४० किलो) मीठ( ६ पोते), चहा (९० पॅकेट), बिस्किटे (१६०० पॅकेट), दुध पावडर (१० किलो), चिक्की (१० पॅकेट), फरसाण (४८ पॅकेट), पाणी (१९ बॉक्स) तर कपड्यांमध्ये साडी (२००), शर्ट(२००), पँट(३००), लहान मुलांचे कपडे (२००), शाल (२७), टूथ पेस्ट (१२२ नग), टूथ ब्रश (१२२ नग) महिलांसाठीच्या वस्तू (५००) असे मिळून जवळपास एक लाख रुपयांपर्यंत मदत संस्थेचे स्वेरीच्या रासेयो तर्फे मदत केली असून रासेयोमधील विद्यार्थ्यांच्या मदतीने संपूर्ण जमा केलेले साहित्य पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. वसंत कोरे यांच्याकडे सोपविले.
गेल्याच आठवड्यात प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपला एक दिवसाचा पगार पुरग्रस्तांना मदत म्हणून ‘ ‘मुख्यमंत्री सहायता निधी’ म्हणून रु.पाच लाख एक हजारांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी नुकताच सोपविला. शिक्षणातच अग्रेसर आहे हे सर्वांनाच माहित आहे परंतु मदत देण्यासाठी देखील मागे नाहीत हेच या मदतीमुळे सिद्ध होते.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________







0 Comments