मुंबई (प्रतिनिधी)- गुरुवार दिनांक २९ ऑगस्ट रोजी दादर,मुंबई येथील प्रसिद्ध अशा शारदाश्रम विद्या मंदिर या शाळेमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने आरोग्य शिबीर घेण्यात आले. दोनशे मुलांनी या शिबिरात सहभाग घेतला. प्रसिद्ध आरोग्य व्याख्याते दत्ता गायकवाड यांचे मार्गदर्शन मुलांना लाख मोलाचे ठरले. उंची वाढवण्यासाठी आवश्यक व्यायाम, शारीरिक प्रगती उत्तम राखण्यासाठी झोपेचे महत्व, शरिराचे पोषण व्यवस्थित व्हावे यासाठी सर्व पोषण तत्व असणारा संतुलित आहार, अभ्यास लक्षात राहावा यासाठी एकाग्रता ,पोस्चर व्यवस्थित कसे राखावे, अशा अनेक विषयांवर दत्ता गायकवाड यांनी मुलांना मार्गदर्शन केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
शाळेच्या मुख्याध्यापिका नीता गुप्ते, सुपर व्हाइजर अंजली कुळकर्णी, सहाय्यक शिक्षिका प्रिया भोईर, शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत पाटील सर, कार्यक्रमाचे इंचार्ज पी. टी. शिक्षक जनार्धन टेमकर यांच्या प्रयत्नातून हे शिबीर पार पडले. टेमकर सरांनी अतिशय उत्तम प्रकारे निवेदनाची जबाबदारी पार पाडली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका नीता गुप्ते यांनी दत्ता गायकवाड यांचे स्वागत केले. शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी इयत्ता आठवी,नववी व दहावी च्या सर्व शिक्षिका उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी दत्ता गायकवाड लिखित "घरच्या घरी करा व्यायाम" या पुस्तकाच्या प्रती सर्व मुलांनी घेतल्या. मुंबई व ठाणे येतील प्रत्येक शाळेमधून दत्ता गायकवाड हे "विद्यार्थी आरोग्य अभियान"राबवणार असून संबंधित शिक्षकांनी आपल्या शाळेत जरूर कार्यक्रम घ्यावेत असे आवाहन दत्ता गायकवाड यांनी केले आहे.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________
0 Comments