बँकांसाठी आणि बँकेतील कर्मचाऱ्यांसाठी सायबर सुरक्षा विषयावर कार्यशाळा संपन्न





मुंबईदि. 20 : सायबर क्राईम बाबत असलेल्या अनभिज्ञतेमुळे बँकिंग क्षेत्रात सायबर क्राईम चा झालेला शिरकाव हा अनेक समस्यांना आमंत्रण देणारा आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघ यांच्यावतीने संलग्नपणे जनजागृती साठी सायबर सुरक्षा या विषयावर कार्यशाळेचे नवी मुंबईतील वाशी येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

या कार्यशाळेत महाराष्ट्र सायबर तर्फे पोलीस अधीक्षक सचिन पांडकरपोलिस निरीक्षक लक्ष्मण कांबळेसायबर विश्लेषक संतोष बोडकेविवेक सावंत आणि संतोष जाधवपोलिस निरीक्षक जयराम पायगुडे यांचा सहभाग होता. सदर कार्यशाळा ही चार सत्रांमध्ये पार पडली. ज्यात बँकांमध्ये सायबर गुन्हे कसे घडतातत्याचा तपास कशा प्रकारे होतो आणि सुरक्षेसाठी कोणती खबरदारी घ्यावी या सारख्या विषयांचा समावेश होता. 

आयडी पासवर्ड चे सायबर चोरीबँक अकाउंटची माहिती गहाळ करून त्याचा होत असलेला गैरवापरमोठ्या मोठ्या बँकाच्या संगणक प्रणालीमध्ये हॅकर्स ने केलेला अनधिकृत प्रवेश आणि त्यामुळे झालेले नुकसानएस एम एस ईमेल किंवा चॅटिंग च्या माध्यमातून होणारी फसवणूक या सर्व गुन्ह्यांबद्दल माहिती देऊन त्यापासून आपला बचाव कसा करावा याबद्दल बँकेतील कर्मचाऱ्यांना आणि नागरिकांना कार्यशाळेत मार्गदर्शन केले गेले.


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


बँकेत अमलात आणता येतील अशा सायबर सुरक्षा विषयक उपाययोजनांबद्दल माहिती देताना बँकांनी शाखास्तरावर तांत्रिक तज्ज्ञांची नेमणूक करावी व सेक्युरिटी ऑपरेशन सेंटर आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी एका तांत्रिक संघाची स्थापना करावी असे महाराष्ट्र सायबरच्या अधिकाऱ्यांनी सुचवले.

 या गोष्टी केल्यास बँका आपल्या इंटरनेट ट्राफिक वर २४ तास लक्ष ठेऊ शकतील व सिस्टीम आणि नेटवर्क लॉग्स चे नियमन आणि देखरेख करू शकतील असे ही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर  बँकेच्या संगणकांवर कर्मचाऱ्यांना त्यांचे वैयक्तिक ईमेल किंवा सोशल मीडिया अकाउंटस वापरण्याची परवानगी देऊ नयेकर्मचाऱ्यांना बँकेच्या प्रणालीशी वाय फाय किंवा इतर कोणत्याही माध्यमातून जोडले जाण्यास मज्जाव करावाबँकेच्या कामासाठी इंटरनेट वापरायचे असल्यास त्यासाठी विशेष तरतूद करावी आणि तसे करताना इंटरनेट आणि इंट्रानेट मध्ये योग्य अंतर राहील याची काळजी घ्यावी अशा सायबर सुरेक्षेसाठीच्या उपायांची माहिती दिली.


_________________________________________________


_________________________________________________


सदर कार्यक्रमातबँक अकाऊंट नंबरपासवर्ड चोरून नागरिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भुर्दंड सोसावा लागल्याची अनेक उदाहरणे देत नागरिकांना आणि बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा नेहमी सतर्क राहावे असे महाराष्ट्र सायबर च्या अधिकाऱ्यांनी आवाहन केले. 

त्याचबरोबर आपली वैयक्तिक व गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये,पासवर्ड वेळोवळी बदलावा, ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना संकेतस्थळे सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी, ऑनलाईन व्यवहार पूर्ण होताक्षणीच लॉगआऊट करावेआपली वैयक्तिक माहिती मागणाऱ्या कोणत्याही मेलला प्रतिसाद देऊ नये अशा सूचना सुद्धा दिल्या.

जनजागृतीच्या उद्देशाने झालेल्या कार्यक्रमांचा नक्कीच बँका आणि कर्मचाऱ्यांना फायदा होईल आणि भविष्यात सुद्धा महाराष्ट्र राज्य सहकारी बँक कर्मचारी महासंघा सोबत एकत्र येऊन आम्ही असे कार्यक्रम करू, अशी ग्वाही पोलिस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी दिली.

सायबर क्राईमची वाढती व्याप्ती लक्षात घेता बँकिंग क्षेत्रात या बाबत जनजागृती होणे अत्यंत महत्वाचे असून अशा कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे त्याच दिशेने उचललेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे असे पोलिस अधीक्षक बालसिंह राजपुत यांनी सांगितले

_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments