संकल्प युवा प्रतिष्ठान पंढरपूर यांनी संयोजित केलेला भव्य असा ‘संकल्प’ दही हंडी सोहळा-2019 दि. 24 ऑगस्ट 2019 रोजी टिळक स्मारक मैदान, पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मुख्य आकर्षण ठरले ते ‘मुळशी पॅटर्न’ फेम अभिनेता ओम भुतकर व ‘बॉईज 2’ फेम अभिनेता पार्थ भालेराव व ‘फुलपाखरु’ फेम अभिनेत्री ॠता दुर्गुळे, या मराठी तारे-तारकांची प्रमुख उपस्थिती.
Video News
संकल्प पतसंस्थेचे चेअरमन प्रथमेश कट्टे व गणेश कराळे यांच्या संकल्पनेतुन साजरा झालेला हा दही हंडी उत्सव पाहण्यासाठी पंढरपूरकरांनी तोबा गर्दी केली होती. प्रेक्षकांच्या गर्दीने खचाखच भरलेलं टिळक स्मारक मैदान पाहुन उपस्थित तारे-तारकांनाही मोठा उत्साह आलेला आढळला. तारे-तारकांनी आपापले प्रसिध्द डायलॉग्स सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली.
दहिहंडी स्पर्धेत तासगाव (सांगली) येथील शिवनेरी ग्रुपने 51 हजार रूपयांचे बक्षिस पटकाविले. स्पर्धेचे उद्घाटन कार्यक्रमासाठी नगराध्यक्षा साधना भोसले, पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, प्रियांका भोसले, पत्रकार शिवाजी शिंदे, पत्रकार सतीश बागल, अभिनेत्री ऋता दुर्गुळे, अभिनेता ओम भुतकर तसेच पार्थ भालेराव, डि.बिल्डर्सचे दत्तात्रय बागल,समाजसेवक नानासाहेब वाघमारे, गणेश अंकुशराव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने 14 जणांना समाजभूषण पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
प्रथमेश कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्प प्रतिष्ठानकडून विविध सामाजिक उप्रकम राबविण्यात येतात. शहरातील टिळक स्मारक मैदान येथे गेल्या वर्षीपासून गोपाळकाल्याच्या दिवशी संकल्प प्रतिष्ठानकडून दहिहंडी स्पर्धा घेण्यात येतात. या स्पर्धेमध्ये राज्यातील विविध भागातून अनेक स्पर्धक सहभागी होतात. या स्पर्धेत यंदा तासगाव येथील शिवनेरी ग्रुपने बाजी मारली. दहिहंडी सोहळा पाहण्यासाठी शहरातील तरूणांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष गणेश कदम, पतसंस्थेचे सचिव अविनाश ठोंबरे, सहसचिव गणेश कराळे, उमेश पांढरे, श्रीकांत पवार,अभिषेक सावंत, शुभम कोरके, हेमंत मेटकरी, ऋषिकेश हाके, ऋषी गावडे, सोमनाथ शिंदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रेखा कोळी चंद्रराव, नंदकुमार दुपडे व उमेश सासवडकर यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments