गेल्या अनेक वर्षापासून खर्चिक स्वरूपात साजरा होत असलेला गणेशोत्सव हा धार्मिक सण म्हणुन आपण धूमधडाक्यात साजरा करतो. पण या उत्सवासाठी आपण किती बेहिशेबी खर्च करतो, याचे गणित करणे ही एक जागतिक समस्या बनली आहे. मान्य आहे की आपण सध्या एकविसाव्या शतकात पदार्पण करतो आहोत, शिवाय स्पर्धेचे युग आहे त्यामुळे प्रत्येक गणेशोत्सव मंडळांत कमालीची चढाओढीची जीवघेणी स्पर्धा सुरू होणे हे स्वाभाविक आहे.
पण याच स्पर्धेमुळे लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव आणि आताचा उत्सव यात किती तफावत आहे. हे दिसून येते.आजच्या उत्सवात धार्मिकतेच्या नावाखाली भांडवलीचे गलिच्छ राजकारण होऊ लागले आहे. लाखो-करोडो रुपयांची उलाढाल होऊ लागली. समाजिक सेवेच्या नावाखाली बाजारी स्वरूप प्राप्त होऊ लागले, काही मंडळा मार्फत "माझा बाप्पा नवसाला पावतो " च्या वल्गना माथी मारून भाविकांची लूटमार करून त्याचे बाजारीकरण केले जाऊ लागले .
भल्या मोठ्या रांगा वाढू लागल्या प्रसंगी चोरीचे प्रकार वाढू लागले , पोलिस यंत्रणेवर भार पडू लागला ....याचे सोयरे सुतक आहे का कुणाला ? ? आज आपल्या महाराष्ट्र भूमीवर फार मोठे संकट कोसळले आहे . अवकाळी बरसलेल्या पर्जन्यवृष्टी मुळे
बदलापूर , सांगली ' सातारा , कराड , कोल्हापूर मध्ये आलेल्या भीषण महापुरानंतर जिल्ह्यात हजारो कोटी रुपयांचं नुकसान झाल आहे. महापुराने हजारो घरे पडली आहेत.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
नगरे वाहून गेले आहे , नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले आहे , गावा-गावांतील संपर्क तुटला आहे ,काही नागरीक या प्रलयकारी पुरात वाहून गेले आहेत , तर काही जण मृत्यू पावले आहेत , गावच्या गाव ओस पडले आहेत प्रत्येक भागाभागात पुरमय परिस्थिती निर्माण होऊन होत्याचे नव्हते झाले आहे. तेव्हा एक हात मदतीचा म्हणुन महाराष्ट्रातील प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साठी सजावटीसाठी होणाऱ्या अवाढव्य खर्चातील किंवा जाहिरातीवर मिळणाऱ्या रकमेवर किमान २५ % रक्कम ही पूरग्रस्तांसाठी मदत निधी म्हणुन बहाल केली पाहिजे.
जेणेकरून त्यांचे जनजीवन पुन्हा त्याच जोमाने आणि अविरतपणे स्थिरस्थावर होईल. त्यांना जगण्याची एक नवी दिशा , नवा जोम मिळेल तसेच त्यांचे झपाट्याने पुनर्वसन होण्यास मदत होईल. आजच्या परिस्थितीचा आढावा घेतला असता या पुरमय परिस्थिती मुळे क्रीत्येक घरे ओस पडून बेघर झाली आहेत. त्यांचे पुनर्वसन होणे ही गरजेची बाब आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रात सुशिक्षित पदवीधर आहेत पण नोकऱ्या नाहीत , गरीब आहेत पण एक वेळचे जेवण त्यांच्या नशिबी नाही. कुणाला शिक्षण हवं असतं पण पैशा अभावी ते शक्य नसतं .
_________________________________________________
_________________________________________________
शेतकरी मालाला दर नसल्याकारणाने कर्जबाजारी होऊन आत्महत्या करताहेत हे कुठे तरी थांबल पाहिजे ....! तेव्हा महाराष्ट्रातील तमाम गणेशोत्सव मंडळांना एकच सांगणे आहे. उत्सव माध्यमासाठी सजावटीसाठी होणारा अवाढव्य खर्च , जाहिराती मधून मिळणारे उत्पन्न अथवा वर्गणी वा देणगी स्वरूपात मिळणारी मदत ही पूरग्रस्तांसाठी त्यांच्या पुनर्वसन साठी , पशुधनविकास , शेतकरी विकास , गोरगरीबांना तसेच त्यांच्या शिक्षणासाठी लावली तर या आपल्या महाराष्ट्रात कुणीच बेरोजगार राहणार नाहीत .
कुणीच शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. आणि आपला शेतकरी राजा कधीच आत्महत्या करणार नाही. यातूनच खरे धार्मिक कार्य केल्यासारखे होईल आणि गणेशोत्सव या सणाला मूर्तिमंत साजेलासे आणि साधेपणाचे स्वरूप प्राप्त होईल .
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments