पंढरपूर / प्रतिनिधी:- राष्ट्रवादी पक्ष प्रमुख माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी पंढरपूर तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसने आज पंढरपूर बंदची हाक दिली आहे. पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी आपला पवित्रा स्पष्ट केला.
गेल्याकाही दिवसापासून राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप ठेवीत त्यांची ईडी मार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय आकसातून सत्ताधारी भाजप पक्षाकडून हे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. सबंध महाराष्ट्रात आज पवारांवरील कारवाईविरोधात महाराष्ट्र बंदची हाक राष्ट्रवादी काँग्रेसने दिली आहे. असे असताना पंढरपूर तालुका आणि शहर राष्ट्रवादी काँग्रेसने तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल कडून आज पंढरपूर बंदची हाक देण्यात आली आहे. यासंदर्भात पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक पवार, शहर अध्यक्ष सुधीर भोसले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संदीप मांडवे, ज्येष्ठ नेते सुभाष भोसले, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या साधना राऊत आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बंद ला काँग्रेस आय, संभाजी ब्रिगेड, कोळी महासंघ, शिवबुध्द युवा प्रतिष्ठान आदींसह अनेक समविचारी पक्ष व संघटनांनी पाठींबा दर्शवला आहे.
लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न-सुभाष भोसले (माजी नगराध्यक्ष)
हायकोर्टात याचिका कुणी दाखल केली, कुणी करायला लावली? हे सगळे भाजपाचे लोक. दर्या बंकेचे पवार सदस्य ही नाहीत त्या शिखर बँकेच्या घोटाळ्यात पवार यांचे नाव का? सतर्कतेचा गैरवापर होतोय, बेरोजगारी वाढलीय, महाराष्ट्राची अधोगती होतीय. असे मत माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले यांनी व्यक्त केले.
शरद पवार हे महाराष्ट्राचे नेते आहेत, सर्वसमावेशक नेते आहेत, त्यांच्यावर होणारी कारवाई ज् अन्यायकारक, सतर्कतेचा दुरूपयोग, निवडणुक काळात चौकशी का? पक्षाच्या पलीकडचं हे महाराष्ट्रातील नेतृत्व आहे. यामुळे पाठींबा- किरण घाडगे (संभाजी ब्रिगेड, पुणे विभागीय अध्यक्ष)
महाराष्ट्र सरकारने आधी चौकशी करायला हवी होती, महाराष्ट्रामध्ये वातावरण पेटवायचे आहे, आचारसंहितेच्या आधी का चौकशी केली नाही. खोटे नाटे आरोप, मोदींचे डिजीटल बोर्ड अनेक ठिकाणी आहेत - संदीप मांडवे (शहराध्यक्ष, राष्ट्र
सर्वपक्षीयांना आवाहन, समविचारी पक्ष आंदोलनात सहभागी -युवराज पाटील
आघाडी सरकारच्या काळापासून चाललेली चौकशी आता का? सुडबुध्दीचे राजकारण, महाराष्ट्रातील जनतेला सर्व माहिती आहे. पत्रकार परिषद घ्यायलाही परवानगी घ्या म्हणतात,
-राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अॅड. दीपक पवार
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments