पंढरपूर. 27:- विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोगाने अधिसूचना जारी केल्यानंतर सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 यावेळेत अर्ज स्विकारण्यास सुरुवात केली आहे. 252-पंढरपूर विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सुदर्शन रायचंद खंदारे (अपक्ष) यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
252-पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी दि. 27 सप्टेंबर 2019 रोजी पर्यंत 20 इच्छुक उमेदवारांनी 36 अर्ज नेले आहेत. यामध्ये अपक्ष म्हणून सुदर्शन खंदारे, संतोष माने, हणुमंत बिराजदार, लक्ष्मण सोनकांबळे, आदम मुजावर, संदीप कदम, आण्णा जाधव, जुबेर बागवान, सचिन गवळी, अनिल नागटिळक, संदीप मुटकूळे, सिध्देश्वर आवारे, बबन आवारे, आप्पासाहेब भोसले, अब्दुल शेख मुलाणी, तानाजी कांबळे तर विनोद कदम यांनी शैला गोडसे, शशिकांत पाटील यांनी दिलीप धोत्रे व बाबासो घायाळ यांनी समाधान आवताडे यांचा उमेदवारी अर्ज घेतला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिनांक 4 ऑक्टोबर असून, शासकीय सुट्टीचे दिवस वगळता सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments