पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरीत 22 हजार किंमतीच्या 4 शेळ्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. दि. 6 सप्टेंबर 2019 रोजी दुपारी 12 ते 4 वाजण्याच्या दरम्यान वेदांत रेसिडेन्सी पाठीमागे, बडवेचर झोपडपट्टी, संत पेठ, पंढरपूर येथून या शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या असल्याची फिर्याद सविता बलभीम पवार, रा. बडवेचर झोपडपट्टी संत पेठ पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
चोरुन नेलेल्या 4 शेळ्या काळ्या रंगाच्या असुन या शेळ्या गाभ आहेत. सदर शेळ्याची एकुण अंदाजे किंमत 22 हजार रुपये एवढी आहे. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द गु.र.न.1450/2019 भा.द.वि.क.379 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पो.ना. औटी हे करत आहेत.
सदर चोरीप्रकरणी गुन्हा नोंदविण्यास शहर पोलीस ठाण्यात आलेल्या महिला भगिणींची तक्रार तात्काळ नोंदवुन घेण्यास सांगुन या गुन्ह्याचा तपास तातडीने करण्याच्या सुचना शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिल्या.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments