म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत मंगळवेढा तालुक्यातील राहिलेल्या गावांचा समावेश करणेसाठी सोमवारी गिरीष महाजन यांचेसोबत मुंबई येथे बैठकीचे आयोजन -आमदार प्रशांत परिचारक


पंढरपूर 8 :- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुका येथे दरवर्षी पाण्याअभावी दुष्काळ सदृश्य परिस्थीती निर्माण होत असते. या तालुक्यातील दक्षिण भागामधील काही गावांना म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमधून समावेश केलेले आहे. परंतु या लागतची गावे म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून वंचित राहीली आहेत.  तरी मंगळवेढा तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आमदार प्रशांत परिचारक यांचेकडे राहीलेल्या गावांचा म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत समावेश करणेसाठी वारंवार मागणी होत होती. 

त्याअनुषंगाने आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून या म्हैसाळ उपसा सिंचन योजनेत मंगळवेढा तालुक्यायातील राहीलेल्या गांवाचा समावेश करणेसाठी मागणी केली होती. या मागणीचा विचार करून सोमवार दि.9 सप्टेंबर 2019 रोजी मंत्रालय, मुंबई येथे जलसंपदा मंत्री मा.गिरीष महाजन यांचे अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी यावेळी दिली. 


_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________


गेल्या वर्षभरापासून याविषयीची बैठक घेण्यासाठी मंत्री महोदय यांचेकडे आमदार प्रशांत परिचारक यांनी मागणी केली होती. परंतु काही कारणास्तव या बैठकीचे आयोजन झाले नाही.
तरी मंगळवेढा तालुक्यातील शिवनगी, आसबेवाडी, येळगी, सोड्डी, लवंगी, सलगर (खु.), सलगर (बु) आदी गांवांचा या योजनेत समावेश करण्यासाठी उद्याच्या बैठकीचे आयोजन केलेले आहे.
तरी उद्याच्या होणार्‍या बैठकीकडे मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतील वंचित राहीलेल्या गावातील नागरीकांचे व शेतकर्‍यांचे लक्ष लागलेले आहे. 

_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________



-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments