मुंबई -लालबाग -परेल :- श्री कात्रादेवी आदर्श वसाहत संघ , परेल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे नेहमीच धार्मिक आणि संस्कृतीप्रधान कार्यक्रम राबवीत असते. यंदाही कात्रादेवी गणेशोत्सव मंडळाद्वारे पर्यावरणाचा समतोल राखता यावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून झाडे लावा -झाडे जगवा हा मोलाचा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा अशा पद्धतीने श्रीगणेश मूर्तीची आरास तयार केली होती.तसेच श्रीगणेशोत्सव निमित्ताने श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करून समस्त भाविकांना महाप्रसाद प्रदान करण्यात आला.
श्री गणेशोत्सवा निमित्त या ठिकाणी श्री सत्यनारायण पूजेचे औचित्य साधुन लहान मुलामुलींसाठी तसेच महिलांसाठी वैविध्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने स्मरणशक्ती , बडबडगीते, चित्रकला , पारंपरिक एकेरी नृत्य, समूह नृत्य, मडके फोडी , वेशभूषा तसेच महिलांसाठी ५६ स्वाहा गणेश भोग, मेणबत्ती पेटविणे अशा विविध सांस्कृतिक स्पर्धांचा समावेश होता.या वैविध्यपूर्ण सोहळ्यासाठी शिवसेना शाखा संघटक माननीय कांचन घाणेकर आणि इतर मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवुन उत्साही कार्यकर्त्यांची मने जिंकली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
कार्यकारी मंडळाने प्रमुख अतिथि शिवसेना संघटक मा.सौ.कांचन घाणेकर तसेच इतर मान्यवर यांचे यथासांग स्वागत करून त्यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्व विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष श्री. गणेश तेरवणकर, सचिव श्री सतीश कविटकर, खजिनदार श्री.वसंत प्रभू , कार्याध्यक्ष श्री हरीशंकर बारी तसेच सर्वश्री गणेश सागवेकर, समीर पालांडे , चेतन सावंत , अमोल डफळे , पराग पाडावे , नेहा सागवेकर , मेघना बर्वे, निखिल सागवेकर , नितीन चव्हाण , सौ.वंदना नर , श्रीमती रेश्मा सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षांनी उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले अशाप्रकारे धार्मिक आणि पारंपरिक पद्धतीने श्री कात्रादेवी आदर्श वसाहत संघाच्या श्रीगणेशोत्सव सोहळ्याची सांगता करण्यात आली.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments