पंढरपूर सिंहगड मध्ये "आजची तरूणाई वास्तव आणि अपेक्षा" या विषयावर व्याख्यान संपन्न
पंढरपूर (प्रतिनिधी) ज्या वयात आपण चमकायचे असते अशा वयात आपण काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढल्या आहेत. या स्पर्धेच्या युगात स्वतःच्या हिंमतीवर कुठलाही व्यवसाय असुद्या तो सुरू केला पाहिजे, मी गेल्या अनेक वर्षापासून माझा स्वतःचा साधा भाजीपाला व्यवसाय करून या व्यवसायातून मी जवळजवळ लाखो रुपये कमाविले आहेत. शैक्षणिक आयुष्यात शिक्षण घेत असताना आपली जडणघडण होत आहे.
या आयुष्यात मला स्वतःला आलेले अनुभव मी लेखन करून समाजापुढे पुस्तकांच्या माध्यमातून ठेवले आहेत. लवकरच माझी एक कादंबरी प्रसिद्ध होणार आहे. समाजात स्वतःचे वेगळ अस्तित्व निर्माण करायचे असेल तर तुम्ही प्रयत्न करत राहिलं पाहिजे. तुम्हाला जर जगामध्ये काही बदल घडवायचा असेल तर आधी तुम्ही स्वतः बदल घडवला पाहिजे, असे मत वक्ते उमेश सासवडकर यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वक्ते उमेश ज्योतिराम सासवडकर यांचे "आजची तरूणाई वास्तव आणि अपेक्षा' या विषयावर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरवात महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग सिव्हिल विभाग प्रमुख डाॅ. चेतन पिसे, डाॅ. श्याम कुलकर्णी, वक्ते उमेश सासवडकर, दिग्दर्शक रविदत्त घोगरगरे, प्रा. गुरुराज इनामदार आदी मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. गुरूराज इनामदार यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________








0 Comments