दर वर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर लाईव्ह कार्यालयातील श्रीगणेशोत्सव उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा केला जात आहे.
पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयातील आज दि. 7 सप्टेंबर 2019 रोजी ‘‘श्री’’ ची सायंकाळची पुजा व आरती पंढरीतील पत्रकार बांधवांच्या शुभहस्ते संपन्न झाली. जेष्ठ पत्रकार नंदकुमार देशपांडे, पत्रकार सुनील उंबरे (दै.सामना), पत्रकार प्रशांत आराध्ये (दै. संचार), पत्रकार रामभाऊ सरवदे (दै.कृषीवल, सा.ठिणगी), पत्रकार दत्ताजीराव पाटील (पंढरी सत्यता), पत्रकार विनायक हरिदास (दै.संचार), पत्रकार रामकृष्ण बिडकर (पंढरी संदेश), पत्रकार अपराजित सर्वगोड (दै.एकमत), पत्रकार कबीर देवकुळ (के.एस.न्युज) आदी पत्रकार बांधवांच्या शुभहस्ते विघनहर्त्या श्रीगणेशाची पुजा व आरती झाली. यावेळी डॉ. सौमित्र देशपांडे उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. त्यामुळे यावर्षीपासुन पंढरपूर लाईव्हच्या कार्यालयात आरतीसाठी आलेल्या मान्यवरांना एक रोपटे भेट देऊन हे रोपटे आपल्या परिसरात लावावे व त्याचे संवर्धन करावे. अशी विनंती करण्यात येत आहे.
यानुसार पत्रकार बांधवांना संपादक भगवान वानखेडे यांचे हस्ते रोपटे भेट देण्यात आले. व हे रोपटे आपल्या परिसरात लावुन याचे संवर्धन करावे अशी विनंती केली.
यावेळी सर्व पत्रकार बांधवांनी यांनी पंढरपूर लाईव्हला च्या कार्याचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या व सर्वांच्या सुख-शांती व समृध्दीसाठी व विद्यार्थ्यांच्या यशासाठी श्रीगणेशाकडे प्रार्थना केली. विनंतीला मान देवुन उपस्थित राहिल्याबद्दल संपादक भगवान वानखेडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________















0 Comments