अवैध सावकारांवर पोलिसांनी उगारला दंडुका... बेकायदेशीर सावकारांविरुध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल.. दोघा जणांना अटक


पंढरपूर (प्रतिनिधी):- अवैधरित्या सावकारकी करणार्‍यांवर पोलीसांनी दंडुका उचलला असुन आज दि. 4 सप्टेंबर 2019 रोजी  बेकायदशीररित्या सावकारकी करणार्‍यां विरुध्द शहर पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याखाली कांहीजणांना पोलीसांनी अटकही केली आहे. 

शहर पोलीस ठाणेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार खाजगी सावकार ज्ञानेश्‍वर तुकाराम शिंदे, रा. देवडे, ता. पंढरपूर याने फिर्यादी सुधीर सुरेश साळुंखे रा. पंढरपूर यांना कौटुंबिक अडचणीकरीता 9, 00, 000 रु. रोख स्वरुपात बेकायदेशीरपणे व बिगर परवाना देवून त्यावर 6, 00, 000 रु. रोख स्वरुपात तसेच उर्वरीत 6 लाख 18 हजार रु. आरोपी जगदीश पवार याचे मालकीची जागा फिर्यादीचे नावे करुन श्रीराम सीटी फायनान्स येथे गहानखत करायला लावून त्यावर आलेली कर्ज रक्कम व त्याचे व्याज फिर्यादीस भरण्यास लावुन अधिकचे 9 लाख रु. मुद्दल मागणी करुन वेळोवेळी मानसीक त्रास देवून जगदीश पवार याचेमार्फत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सन 2013 ते आजपर्यंत हा प्रकार सुरु आहे. अशी फिर्याद सुधीर साळुंखे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणेत दिली आहे.

त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी तात्काळ चौकशी करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधि. सन 2014 चे कलम 39, 45 सह भादविकाक 504, 506, 34 प्रमाणे आज दि. 4 सप्टेंबर 2019 रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात वरील आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी (सावकार) ज्ञानेश्‍वर तुकाराम शिंदे (वय44) रा. देवडे, ता. पंढरपूर याचेसह त्याचा साथीदार जगदीश अशोक पवार (वय 40) रा. हनुमान मैदान, दिवानी कोर्टाच्या पाठीमागे, पंढरपूर यांना अटक केली आहे. 

गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. जी. गाडेकर हे करत आहेत.

अवैध सावकारीला चाप लावण्यासाठी पोलीसांचे नागरिकांना आवाहन

पंढरपूर वासीयांना पोलीसांनी अवैध सावकारकीला चाप बसविण्यासाठी अजाहीर आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे अवैध सावकारी व्यवसाय करणारे वगैरे प्रकारे कोणी त्रास देत असल्यास आम्हाला समक्षपणे भेटून अथवा आमचे मोबा. नं. 9423884745 तसेच कार्यालयीन नंबर 02186- 223443 वर संपर्क सधुन तात्काळ गोपनीय माहिती द्यावी.



_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा. 
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे 
मोबाईल क्र.  8308838111  
_________________________________________________

मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
 फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
                   संपर्क
         नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट 
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587

        *सोलापूर जिल्हा प्रतिनिधी* 
           *Mallikarjun Swami* 
 *9588488845 / 7028502798*
_________________________________________________




_________________________________________________


_________________________________________________



_________________________________________________

शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 ,  9921715300

_________________________________________________



_________________________________________________


-------------------------------------------------------

पंढरीचे सर्वात आधीचे ई-न्युज वेब चॅनल " पंढरपूर  Live " 

तब्बल 45 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या 

पंढरपूर  Live वर आपली, आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..! 

कार्यालय:- शिवयोगी मंगल भवन, लिंक रोड, पंढरपूर, 

जि. सोलापूर 413304

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे  

उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whats Up -  8308838111, 7083980165 

Mobile- 8149624977

Mail- livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments