श्री पांडुरंग प्रतिष्टान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेमध्ये,’शाळेचा स्थापना दिवस’ व गणपती स्थापना हा दुग्धशर्करा योग्य जुळून आला. मा.आमदारप्रशांतजी परिचारक यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला शाळारूपी वृक्ष हळूहळू मोठा होऊ लागला. त्याच प्रसंगाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये स्थापना दिवस व इको फ्रेंडलीगणपती प्रतिष्ठापना माजी आमदार श्री. सुधाकरपंत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आली.
याप्रसंगी इको फ्रेंडली गणेशाची वाजत गाजत विद्यार्थी व शिक्षकांनी मिरवणूक काढली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध लेझीम प्रकार या मिरवणूकीवेळी सादर केले.साथीला ताल देत विद्यार्थ्यांनी ढोल-ताशाचा गजर केला. मान्यवरांचे स्वागत प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते आपल्या लाडक्या बाप्पाचीप्रतिष्ठापना करण्यात आली. याप्रसंगी पुरोहिताची जबाबदारी कलाशिक्षक श्री.नारायण कुलकर्णी यांनी पार पाडली.बाप्पाच्या आरतीने प्रशालेतील सर्व वातावरण भक्तिमयहोऊन गेले. यावेळी प्रशालेच्या स्थापना दिवसापासून ते आज पर्यंतचा प्रवास ही व्हिडिओ क्लिप सर्वांना दाखवण्यात आली.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
या कार्यक्रमाचे नियोजन प्रशालेचे रजिस्टार श्री.गणेश वाळके सर, प्राचार्या सौ.शैला कर्णेकर मॅडम,राजेंद्र सावंत यांनी केले. तसेच श्री.राहुल काळे,सौ योगिनी ताठे,श्री,अमोल डुणे,पल्लवी दशरथ,श्री.किरण गोरे तसेच इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________

0 Comments