पंढरपूर / प्रतिनिधी :- वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने चंद्रभागा नदीच्या पात्रात पुलावरून खाली पडलेला दुधाचा टँकर वाहन चालकासह नदीपात्रात बुडाला. याप्रकरणात वाहन चालकासह इतर प्रवाशांची जीवित हानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही घटना गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली ज्याठिकाणी गाडी बुडाली त्या ठिकाणीच ती सापडली होती परंतु क्रेन ने वर उचलताना पुन्हा नदीपात्रात पडली असल्याचे समजते. नदीपात्रातील विसर्ग वाढतच असल्यामुळे पाण्याच्या प्रवाहाचा वेग कमालीचा वाढलेला आहे. त्यामुळे मदत कार्यात अडचणी वाढत आहेत.
गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कुर्डूवाडी वरून दुधाने भरलेला टँकर पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदीवरील आहिल्या पुलावर आला असता वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पुलावरून नदीपात्रात कोसळला. याबाबत समजलेल्या माहितीनुसार हा टँकर तिरूमला डेरीचे दूध संकलन करण्याकामी कार्यरत होता. टी एन 88 डी 8241 हा दुधाचा टँकर कुर्डूवाडी कडून पंढरपूरकडे येत होता. नदीपात्रात कोसळलेल्या या टँकर मध्ये एक वाहनचालक असल्याची माहिती तिरूमला कंपनीने दिली असली तरी, घटना घडली यावेळी नदीपात्रात टँकरसह तीन लोकांना बुडताना पहिल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत आहेत. यामुळे या घटनेत जीवित हानी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी दिवसभर क्रेनच्या साह्याने हा टँकर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु गुरुवारी रात्री उशिरापर्यंत यश आले नाही. दरम्यान चंद्रभागा नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत असल्याने या टँकरचा पत्ता लागणे अवघड होत आहे. यामुळे शोध पथकाचे काम वरचेवर जिकिरीचे बनत आहे.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
(ADV.) विसावा मंदिरामागे, इसबावी पंढरपूर येथील दुकानगाळे
भाड्याने देणे आहेत * रोडटच * सर्वसुविधांनीयुक्त
* बँकेसाठी, गोडाऊनसाठी उपयुक्त
संपर्क:- ज्ञानेश्वर गायकवाड. 9921783909
_________________________________________________
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________








0 Comments