लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मध्ये शिक्षक दिन साजरा
पंढरपूर- ‘आज आपण कोणत्याही उच्च पदावर गेलो तर आठवण येते ती आपल्या शिक्षकांची ! आपल्या जीवनात वेळोवेळी शिक्षक मार्गदर्शन करतात तरीपण आपल्याला खऱ्या अर्थाने आपले आई-वडील हेच प्रथम संस्कारित करत असतात. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. म्हणून खऱ्या अर्थाने ‘शिक्षक’ म्हणून पहिला मान हा आपसूकच आई-वडील यांच्याकडे जातो. त्यानंतर पुढे आपल्या जीवनाला योग्य आकार देतात ते शाळेतील शिक्षक! त्यानंतर पुढे विद्यार्थ्यांनी ठरवलेले ध्येय पूर्ण करण्यासाठी शिक्षक हा जीवाचे रान करतो. म्हणून विद्यार्थी व त्याचे ध्येय यामधील शिक्षक हा दुवा असतो. विद्यार्थ्यांचे इच्छित ध्येय पूर्तीसाठी शिक्षक वेळप्रसंगी खंबीरपणे उभा राहून योग्य मार्गदर्शन करतो.’ असे प्रतिपादन लोटस इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ जयश्री चव्हाण यांनी केले.
_________________________________________________
पंढरपूर लाईव्ह वर जाहिराती देण्यासाठी संपर्क साधावा.
मुख्य संपादक:- भगवान वानखेडे
मोबाईल क्र. 8308838111
_________________________________________________
मुळव्याधीचा समुळ नाश (ADV.)
फक्त एका महिन्यात *लवनोतंम चूर्ण (मुळांती पावडर)
घरपोहोच सेवेसाठी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा
*9145449999 / 9145889999
संपर्क
नवजीवन ऍग्रो प्रोडक्ट
यशोदा नगर, पाइपलाइन रोड, अहमदनगर. 9850254587
*सोलापूर जिल्हा प्रतिनिधी*
*Mallikarjun Swami*
*9588488845 / 7028502798*
_________________________________________________
कासेगाव (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल इन्स्टिट्यूट ऑफ प्रोग्रसिव एज्युकेशन संचलित लोटस इंग्लिश स्कूलअँड ज्युनिअर कॉलेजमध्ये भारताचे राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या १३१व्या जयंतीनिमीत्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. चव्हाण ह्या मार्गदर्शन करत होत्या. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेच्या पूजनानंतर इयत्ता बारावी व दहावी मधील विद्यार्थ्यांनी ‘शिक्षक दिना’ निमित्त विचार प्रकट केले. शिक्षक वैभव घाडगे आणि सागर शिंदे यांनी देखील शिक्षक आणि विद्यार्थी यांचे महत्व स्पष्ठ केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ.बी.पी. रोंगे, विश्वस्त दादासाहेब रोंगे, अध्यक्ष बी. डी. रोंगे, उपाध्यक्ष एच. एम. बागल यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.सूत्रसंचालन साक्षी मोरे,जान्हवी माळी व वैष्णवी नागणे यांनी केले तर आभार श्रुतिका पाटील यांनी मानले.
_________________________________________________
_________________________________________________
_________________________________________________
शासनमान्य औषधीपासुन 100% व्यसनमुक्ती (Adv.)
Contact :- 9421068300 , 9921715300
_________________________________________________
_________________________________________________






0 Comments